Team My Pune City – प्रेमसंबंधात अडथळा आणल्याच्या ( Katraj Murder)रागातून अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करत पुणे ग्रामीणच्या राजगड पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून तिघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर कात्रजमधील सौरभ स्वामी आठवले (वय 25, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, कात्रज) याचा खून करण्यात आला होता.
Astrological convention : ४३ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उदघाटन
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर एक मृतदेह पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटविली असता तो सौरभ आठवले यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सौरभ 18 ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार आधीच नातेवाईकांनी पोलिसांकडे नोंदवली होती.
तपासाच्या धाग्यांवरून पोलिसांनी सौरभच्या मित्रमंडळी व नातेवाईकांकडे ( Katraj Murder) चौकशी केली. मात्र, सुरुवातीला खुनामागचे कारण स्पष्ट होत नव्हते. दरम्यान, तांत्रिक तपासात पोलिसांना माहिती मिळाली की हा खून काही अल्पवयीनांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कात्रज घाट परिसरातील गोगलवाडी येथे येणार असल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
मांगडेवाडी परिसरात अल्पवयीन आरोपी त्याच्या आत्याकडे ( Katraj Murder)राहत होता. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, सौरभने त्या मुलीला बहीण मानले होते व तिला दररोज शाळेत सोडण्याची जबाबदारी घेतली होती. सौरभने या मुलीच्या प्रेमसंबंधाबाबत तिच्या आईवडिलांना माहिती दिल्यानंतर अल्पवयीन आरोपी संतप्त झाला. त्याने आत्याचे घर सोडून वडगाव मावळ येथे वास्तव्य केले.
यानंतर रागाच्या भरात अल्पवयीन आरोपीने सौरभच्या ( Katraj Murder)खुनाचा कट रचला. साथीदारांच्या मदतीने त्याने सौरभला जुन्या कात्रज बोगद्याजवळ भेटायला बोलावले. डोंगरावर नेऊन आरोपींनी सौरभवर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. या गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल संच आणि दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून, अल्पवयीन आरोपींवर बालन्याय मंडळामार्फत कारवाई केली ( Katraj Murder) जात आहे.