भालचंद्र ज्योतिर्विद्यालय कडून आयोजन
ज्योतिष प्रसारासाठी कार्य करण्याचे आवाहन
Team My pune city – भालचंद्र ज्योतिर्विद्यालय ( Astrological convention ) आयोजित ४३ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उदघाटन पुण्यात २१ ऑगस्ट रोजी सकाळी महालक्ष्मी मंगल कार्यालय (मित्रमंडळ, पर्वती) येथे झाले. दोन दिवसीय या अधिवेशनात देशभरातील नामवंत ज्योतिर्विद सहभागी झाले आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत विविध चर्चासत्रे, मार्गदर्शन सत्रे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील १२ संस्थांचा या अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग आहे.ज्योतिष प्रसारासाठी कार्य करण्याचे आवाहन वक्त्यांनी यावेळी बोलताना केले.
Pune Metro : बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री उशिरापर्यंत करता येणार प्रवास
या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अरुण हुपरीकर आणि डॉ. नीलेश कुलकर्णी आहेत. उदघाटन सोहळा उल्हास पाटकर, विजय जकातदार, अविनाश मग्गीरवार, राज कुंवर, नवनीत मानधनी, चंद्रकला जोशी, रोहित वर्मा, नवीनभाई शहा, व. दा. भट, उमेश कुलकर्णी व कैलास केंजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी उल्हास पाटकर यांचा अमृतमहोत्सव निमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच विजय जकातदार दांपत्याला चंद्रपुष्प पुरस्कार आणि रमेश पलंगे यांना वास्तूमहर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला. सौ.गौरी केंजळे यांनी सूत्रसंचालन ( Astrological convention ) केले. ज्योतिषविषयक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
या अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी होणार असून त्यावेळीही ज्योतिष विषयक विविध सत्रे आणि पुरस्कार वितरण सोहळे पार पडणार आहेत.
२२ ऑगस्ट रोजी दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे ( Astrological convention ) उद्घाटन डॉ.सुनीता पागे,डॉ.सीमा देशमुख,नाटेकर,मोहन दाते,सिद्धेश्वर मारटकर,मोहन फडके,शुभंगिनी पांगारकर,मधुसूदन घाणेकर,शशिकांत ओक,नितीन गोठी,चारुशीला कांबळे,सोपान बुडबाडकर,जानकी पाचारणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.याच दिवशी कै.शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार सौ.जयश्री बेलसरे यांना , सौ.पुष्पा शेवाळे यांना शिक्षक रत्न पुरस्कार,चित्रकार ज्ञानेश सोनार यांना ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.