Team My pune city – हिंजवडी येथे बांधकाम व्यावसायिकाच्या ( Hinjawadi Crime News) कार्यालयात सेल्स मार्केटिंगचे काम करणाऱ्या महिलेचे बुधवारी (20 ऑगस्ट) सायंकाळी अपहरण झाले. त्यानंतर शहर पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी सूत्रे हलवून तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्वतःच्या नवऱ्याचे अनैतिक संबंध थांबवण्यासाठी संतप्त पत्नीने आपल्या भावाला व आईला घेऊन थेट नवऱ्याच्या प्रेयसीचे अपहरण केल्याचे समोर आले.
बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ब्रम्हा क्रॉप फेज-2, विप्रो सर्कल येथे( Hinjawadi Crime News) एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. “तुमचे पार्सल द्यायचे आहे” असे सांगत महिलेला ऑफिसबाहेर बोलावून घेतले. त्या ठिकाणी निळ्या रंगाच्या कारमधून आरोपी पत्नी, तिचा भाऊ आणि आई उतरले. त्यांनी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिला ताथवडे आणि वाकड परिसरात फिरवत बेदम मारहाण केली.
Mockdrill : आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉकड्रील
कारमध्ये बसवून घेतल्यानंतर आरोपी पत्नीने संतापून नवऱ्याच्या प्रेयसीला दम दिला. “माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”. त्यानंतर तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. तब्बल दोन ते अडीच तास सुरू असलेल्या या थरारामुळे महिला भयभीत झाली होती.( Hinjawadi Crime News)कारमध्ये बसवून घेतल्यानंतर आरोपी पत्नीने संतापून नवऱ्याच्या प्रेयसीला दम दिला. “माझ्या नवऱ्याचा नाद सोडून दे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील”. त्यानंतर तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. तब्बल दोन ते अडीच तास सुरू असलेल्या या थरारामुळे महिला भयभीत झाली होती.
पोलिस नियंत्रण कक्षाला अपहरणाची माहिती मिळताच हिंजवडी( Hinjawadi Crime News) पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी महिलेला जबरदस्तीने कारमध्ये कोंबताना स्पष्ट दिसले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि खबऱ्यांच्या आधारे गाडीचा पाठलाग केला असता संबंधित कार वाकड पोलिस ठाण्यासमोर असल्याचे दिसले. तिथे आरोपी महिला आणि तिची आई पीडित महिलेला मारहाण करत होती. तर तिचा भाऊ या प्रकरणाचा व्हिडिओ बनवत होता.
नवऱ्याच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपी पत्नीने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणात पत्नी, तिचा भाऊ व आईविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास ( Hinjawadi Crime News) करत आहेत.