situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri ChinchWwad Crime News 21 August 2025 : तीन कामगारांच्या मृत्यू प्रकरणी पाच दिवसानंतर गुन्हा दाखल

Published On:
Pimpri ChinchWwad Crime News 21 August 2025

Team My pune city – सुरक्षेची साधनसामग्री न पुरवता कामगारांना धोकादायक परिस्थितीत काम ( Pimpri ChinchWwad Crime News 21 August 2025) करण्यास लावल्याने तीन कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्ट रोजी निगडी प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी पाच दिवसानंतर ठेकेदार आणि बीएसएनएल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर रमेश शिवाजी पाटील (४६, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह बीएसएनएल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात बीएनएस कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश पाटील याला बीएसएनएल कंपनीच्या बंद असलेल्या डक्टमधून नवीन ओ.एल.टी.ई. बसवण्यासाठी ऑप्टिकल फायबर पॉइंट काढण्याचे काम करायचे होते. हे काम करताना कामगारांना मास्क, हँडग्लोव्हज, गमबूट आणि श्वसनास त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ती सुरक्षा साधने पुरवणे गरजेचे होते. मात्र, याची जाणीव असतानाही आरोपीने ही साधने न पुरवता अकुशल कामगारांना काम करण्यास पाठवले. काम करत असताना दत्तात्रय विजयकुमार व्हनाळे, लखन उर्फ संदीप आशरुबा धावरे आणि साहेबराव संभाजी गिरशेट या तीन कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.


हॉटेलचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून मित्राचा खून ( Pimpri ChinchWwad Crime News 21 August 2025)

हॉटेलमध्ये दारूचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून चार जणांनी मित्राचा खून केला. ही घटना मंगळवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी तळवडे येथील सम्राट गार्डन हॉटेल येथे घडली.

गणेश लक्ष्मण पोखरकर (३४, विठ्ठलवाडी देहुगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष बांबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद विश्वनाथ मोरे (४५, विठ्ठलवाडी देहुगाव), गोरख विष्णू कुटे (४५, दत्तवाडी आकुर्डी), संतोष आनंद मराठे (३९, आकुर्डी) आणि चंद्रकांत दत्ता बुट्टे (३९, आकुर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विनोद, गोरख आणि संतोष या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पोखरकर आणि आरोपी हे मित्र आहेत. ते तळवडे येथील सम्राट गार्डन हॉटेलमध्ये दारू पीत बसले होते. हॉटेलचे बिल देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात आरोपी विनोद मोरे याने हॉटेलमधील लाकडी दांडक्याने गणेश पोखरकर याच्या पाठीवर, पोटावर आणि छातीवर मारहाण करून त्याला जखमी केले. त्यानंतर गणेश पुन्हा आरोपीवर धावून गेल्यावर, इतर आरोपींनी संगनमत करून त्याला लाकडी दांडक्यांनी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.

Rotary District : रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण दवणे यांची निवड


दारूच्या विकत आणण्याच्या वादातून मित्रावर चाकूहल्ला ( Pimpri ChinchWwad Crime News 21 August 2025)

दारू विकत आणण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून एकाने आपल्या मित्रावर चाकूने हल्ला केला. ही घटना बुधवारी (२० ऑगस्ट) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मोशी येथील मॉडर्न वाईन्स या दुकानासमोर घडली.

तुकाराम संदीप साळवे (३३) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संदीप बाबुराव साळवे (६२, बोराटेवस्ती, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गणेश चंद्रकांत बोराटे (४०, बोराटेवस्ती, मोशी), सचिन कदम (३०, संजयगांधी नगर मोशी), रमेश धनगावे (३१, संजयगांधी नगर मोशी) आणि नवनाथ लांडगे (४०, संजयगांधी नगर मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी गणेश बोराटे याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा तुकाराम साळवे आणि त्याचे मित्र आरोपी गप्पा मारत बसले होते. दारू विकत आणण्याच्या कारणावरून आरोपी आणि तुकाराम यांच्यात भांडण झाले. यावेळी आरोपीने तुकारामला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. आरोपींनी चाकूने तुकाराम याच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Maval Fire News : शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळून खाक; मावळातील नायगाव येथील घटना 


लष्करी अधिकारी असल्याचे भासवून व्यक्तीची फसवणूक ( Pimpri ChinchWwad Crime News 21 August 2025)

स्वतःला भारतीय लष्करातील जवान असल्याचे भासवून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची ७९ हजार ९९७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना १ जुलै ते २ जुलै या कालावधीत चाकण येथील आयफेल सिटी जवळ घडली.

या प्रकरणी अजय कुमार हेमंत कुमार (२५, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी दीपक बजरंग पवार (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी अजय यांचा विश्वास संपादन केला. अजय तीनयांना  महिन्यांचे भाडे एकाच वेळी पाठवतो असे सांगून, ओरपीने अजय यांच्या युपीआय आयडीवरून सुरुवातीला काही रक्कम पाठवण्यास सांगितले. अशाप्रकारे आरोपीने फिर्यादीकडून एकूण ७९ हजार ९९७ रुपये गुगल पे च्या माध्यमातून घेऊन फसवणूक केली. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.


तडीपार गुंडासह तिघांना अटक; तीन पिस्तूल, दोन काडतुसे जप्त ( Pimpri ChinchWwad Crime News 21 August 2025)

पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी शस्त्र बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्यासह वेगवेगळ्या कारवायांमध्ये तिघांना अटक करून त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेदांत मच्छिंद्र मेदगे (१९, अवधर, खेड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (२० ऑगस्ट) भामचंद्र डोंगराजवळ करण्यात आली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायकर यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिरगाव येथे एका तरुणाला अनाधिकाराने गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी बुधवारी (२० ऑगस्ट) अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे एक पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे एक काडतूस जप्त केले आहे. सचिन रमेश बंदीछोडे (२४, म्हाळसकरवाडी, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाच मधील पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंड आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत (२३, चिंचवड) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सप्टेंबर २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधीत संपण्यापूर्वी आकाश शहरात आला. त्याने स्वतःकडे पिस्तूल बाळगले. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे एक काडतूस जप्त केले आहे.

Follow Us On