Team My Pune City – पुणेकरांसाठी दिलासादायक ( Pune Metro) बातमी समोर आली आहे. स्वारगेट–कात्रज या सुमारे पाच किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकेवर आता दोन नवीन स्थानकांची भर पडणार आहे. आतापर्यंत या मार्गावर मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी तीन स्थानके मंजूर होती. मात्र स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार अखेर बिबवेवाडी आणि बालाजीनगर या दोन नवीन स्थानकांना देखील मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील देण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत ( Pune Metro) ट्विट करून माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर बिबवेवाडी आणि बालाजीनगर स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे. ही पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे.”
Alandi : इंद्रायणी नदीपात्रात वाहत जाणाऱ्या युवकास आपत्ती व्यवस्थापना कडून जीवदान
गेल्या काही दिवसांपासून बालाजीनगर परिसरातील ( Pune Metro) नागरिक आणि लोकप्रतिनिधी याठिकाणी स्थानक व्हावे अशी सातत्याने मागणी करत होते. त्यावर विचार करून संबंधित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. अखेर या मागणीला मान्यता मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
Maval Fire News : शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळून खाक; मावळातील नायगाव येथील घटना
दरम्यान, या बैठकीत पुणे–लोणावळा उपनगरीय रेल्वेमार्गालाही गती मिळाली आहे. या मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे औद्योगिक, निवासी आणि व्यावसायिक विकासाला चालना मिळणार असून वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला ( Pune Metro) जात आहे.
स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्गावरील या दोन नवीन स्थानकांमुळे हजारो प्रवाशांना प्रवासाची सोय होणार असून वाहतुकीवरील ताण कमी होण्यास हातभार ( Pune Metro) लागेल.