Team My Pune City- मुसळधार पावसामुळे (Mulshi Dam)मुळशी धरण 98 % भरले आहे. पाऊस अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.नदीपात्रात विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला आहे.
मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत 19500 क्युसेक ने विसर्ग सुरू आहे. आज रात्री 10:00 वाजता 25400 क्युसेक करण्यात येईल, तसेच पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील 4 ही धरणे सरासरी 96 टक्कांवर, पाणीसाठा वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.