Team My pune city – औषध निर्मिती कंपनीत टेक्निकल ( Pimpri Chichwad Crime News 19 August 2025)मॅनेजर पदी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ७७.६२ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना डिसेंबर २०२४ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत वाकड ऑनलाइन माध्यमातून घडली. आरोपींनी बनावट नावे आणि बनावट कंपनीची वेबसाईट तयार करून ही फसवणूक केली.
याप्रकरणी डॉ. सुनील लक्ष्मण हरेर (४४, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण विनायक परीतकर (६२, पुणे), शिवा (दिल्ली कस्टम अधिकारी), मिसेस मिश्रा आणि ओलीवेरा मार्टिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांना एका फार्मास्युटिकल कंपनीचे एच.आर. आणि डायरेक्टर असल्याचे भासवून डॉ. हरेर यांना कंपनीत टेक्निकल मॅनेजरची नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी बनावट नावे आणि बनावट वेबसाईट वापरून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. मात्र, नोकरी देण्याचे आश्वासन पूर्ण न करता त्यांनी फिर्यादीची ७७ लाख ६२ हजार १४२ रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ११ लाखांची फसवणूक ( Pimpri Chichwad Crime News 19 August 2025)
व्हॉट्सअॅपवर बनावट लिंक पाठवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यक्तीची ११ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना २९ जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.
याबाबत संजय चंद्रकांत बाबर (५२, संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली. फिर्यादीने ती लिंक उघडल्यावर त्यांच्या फोनमध्ये एक ॲप डाउनलोड झाले. त्यानंतर, ॲपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सांगून आरोपींनी फिर्यादीला काही बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. फिर्यादींनी त्या खात्यांवर ११ लाख १५ हजार रुपये पाठवले. त्यांना कुठलाही मोबदला न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
बनावट ॲपद्वारे ३१ लाखांची ऑनलाइन फसवणूक
एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप ग्रुपवर ॲड करून बनावट ॲपद्वारे शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करायला सांगत ३१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ या काळात रावेत येथे घडली.
याप्रकरणी पराग चंद्रकांत चव्हाण (४४, विश्रांतवाडी, पुणे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंधन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, इको बँक, ईएसएएफ स्मॉल फायनान्स बँक, इंडियन ओव्हरसिझ बँक, सिटी युनियन बँक लिमिटेडच्या खातेधारक आणि एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या ॲडमिन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ॲड करून घेतले आणि त्यांना एक बनावट ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि त्यांच्याकडून ३१ लाख १६ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर कोणताही नफा न देता आणि गुंतवणूक केलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करत आहेत.
पुणे मुंबई महामार्गावर पिस्तुलासह एकाला अटक ( Pimpri Chichwad Crime News 19 August 2025)
पुणे मुंबई महामार्गावर एका तरुणाला पिस्तुलासह पकडण्यात आले आहे. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी दुपारी २:३० च्या सुमारास घोरावडेश्वर पायथ्याजवळ करण्यात आली.
सोहम सागर शिंदे (२१, जांभुळगाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहम शिंदे याच्या ताब्यात ७१ हजर रुपये किमतीची दोन देशी बनावटीची गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे बेकायदेशीर आणि विनापरवाना आढळून आली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
पाणी बिलाच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक ( Pimpri Chichwad Crime News 19 August 2025)
पाणी बिलाच्या नावाखाली एका कंपनीची २० लाखांहून अधिक रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना २५ जुलै रोजी सकाळी एमआयडीसी चिंचवड येथे घडली. आरोपीने व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून आणि फोन करून ही फसवणूक केली.
याबाबत गुरुचरनसींग मस्सासींग संधु (८५, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांक धारक अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या कंपनीच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एमआयडीसीच्या नावाने पाणी बिलासंदर्भात एक मेसेज आला. चुकून तो मेसेज फिर्यादीकडून उघडला गेला. त्यानंतर, त्याच मोबाईल नंबरवरून फिर्यादीला फोन आला, ज्यात समोरच्या व्यक्तीने स्वतःला एमआयडीसी पाणी पुरवठा विभागातून बोलत असल्याचे सांगितले. त्याने कंपनीचे पाणी बिल आयडेंटिफिकेशन चार्जेस १३ रुपये शिल्लक असल्याचे सांगितले. फिर्यादीने त्यांचा फोन त्यांच्या अकाउंटंटकडे दिला. त्यानंतर, फिर्यादीच्या कंपनीच्या बँक ऑफ इंडिया खात्यातून एकूण २० लाख ३९ हजार १९८ रुपये कापले गेले. निगडी पोलीस तपास करत आहेत.
कोयत्याच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी ( Pimpri Chichwad Crime News 19 August 2025)
एका व्यक्तीला दोघांनी हाताने मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १८ ऑगस्ट रोजी रात्री काळेवाडी येथील साई मल्हार कॉलनी, तापकीर चौक येथे घडली.
याप्रकरणी शरबेज सरदार हुसैन (४१, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित दत्ता भोरे (३०, रहाटणी) आणि किरण ईश्वर मिरगे (३०, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. त्यानंतर दोघांनीही हातात कोयता घेऊन “तुला आत्ताच्या आत्ता खल्लास करून टाकतो” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत
दापोडी मध्ये पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकास अटक ( Pimpri Chichwad Crime News 19 August 2025)
एका तरुणाने पिस्तुल बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने १८ ऑगस्ट रोजी दुपारी दापोडी-सांगवी संगम क्रॉस रोडवरील श्री सूर्यमुखी महादेव मंदिराच्या रोडवर केली.
याबाबत राहुल संजय सरोदे (२३, जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेब विजय दौंडकर यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल सरोदे याच्या ताब्यात ५० हजर रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल बेकायदेशीररित्या आढळले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक ( Pimpri Chichwad Crime News 19 August 2025)
एका व्यक्तीने देशी बनावटीचे पिस्तुल बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी दुपारी महाळुंगे एमआयडीसी येथील येलवाडी गाव हद्दीत, मंगलमूर्ती हॉस्पिटलसमोर करण्यात आली.
या प्रकरणात जितेंद्र राम धुमाळ (४०) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलीस कॉन्स्टेबल रामदास मेरगळ यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र धुमाळ याच्या ताब्यात ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल विनापरवाना व बेकायदेशीररित्या आढळले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एकास अटक ( Pimpri Chichwad Crime News 19 August 2025)
सार्वजनिक ठिकाणी गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी रात्री ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथील सह्याद्री रोडवेज कंपनीजवळ करण्यात आली.
या प्रकरणात प्रतिक शंकर रसाळ (२१, देहूरोड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल दिपक पिसे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक रसाळ हा ट्रान्सपोर्टनगर येथे शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन प्रतीक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार ५०० रुपये किमतीचा एक देशी गावठी कट्टा आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.