situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून 35 हजार 574 क्युसेक्स विसर्ग सुरू

Published On:
Pune Rain News

Team My Pune City – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून पाण्याचा(Khadakwasla Dam) विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज, दि. 19 रोजी सायंकाळी सात वाजता धरणातून 35 हजार 574 क्युसेक्स इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

पुणे सिंचन भवन येथून मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाचा विसर्ग मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता तब्बल 24 हजार 827 क्युसेक इतका करण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाच्या सुप्रीया जगताप यांनी दिलेल्या या माहितीनुसार, विसर्गाचे प्रमाण 20 हजार क्युसेकपेक्षा जास्त झाल्यास पुणे शहर आणि परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.

Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट


Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील  4 ही धरणे सरासरी 96 टक्कांवर, पाणीसाठा वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

मागील काही दिवसांपासून घाटमाथ्यावर तसेच पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे खडकवासला धरण प्रशासनाने विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या विसर्गामुळे मुठा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या मुठा नदी काठच्या नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी, नदीकाठावर थांबू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: सिंहगड रस्ता, खडकवासला, दत्तवाडी, वारजे, कोथरूड, डेक्कन, बुधवार पेठ, मंडई परिसर तसेच नदीकाठच्या झोपडपट्ट्यांतील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

धरणातून 20 हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग झाल्यास शहरात पाणी साचण्याची शक्यता, काही भागांत घरे-रस्ते जलमय होणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

खडकवासला धरणातून सुरू होणारा हा वाढीव विसर्ग लक्षात घेता, पुढील काही तास पुणे शहर व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Follow Us On