Team My Pune – पुणे शहरात दोन दिवसापासून ( Heavy Rain) झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यातील हवाई वाहतूक व रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली. खराब हवामान, दृश्यमानता कमी होणे आणि रस्त्यांवरील वाहतूककोंडी यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक बिघडले.
हवाई वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. दिल्लीहून पुण्याकडे येणारे इंडिगोचे विमान (6E-5387) दुपारी 1.20 वाजता पुण्यात उतरणार होते. ( Heavy Rain) मात्र, दृष्यमानता कमी झाल्याने हे विमान हैदराबादला वळवावे लागले. याशिवाय, पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या तीन विमानांना देखील मोठा विलंब झाला. यात इंडिगोची पुणे- दिल्ली सेवा (6E-2285) ही नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने म्हणजे दुपारी 2.05 ऐवजी 4.35 वाजता रवाना झाली. पुणे- जळगाव (IC-5606) हे विमान दुपारी 3.55 ऐवजी 5.40 वाजता सुटले, तर स्पाईसजेटची पुणे-जयपूर सेवा (SG-1080) सायं. 5.30 वाजता सुटणे अपेक्षित होते, पण ती उशिरा रात्री प्रवासाला निघाली.
Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट
रस्ते वाहतुकीवरही पावसाचा मोठा परिणाम झाला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) शिवनेरी बस सेवा मुंबई-पुणे मार्गावर पाणी साचल्याने व वाहतूककोंडीमुळे विस्कळीत झाल्या. मुंबईहून स्वारगेटकडे येणाऱ्या बसांना जवळपास एका तासाचा उशीर झाला. तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दिवसभर वाहनांची ( Heavy Rain) गती मंदावलेली होती.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने मात्र गाड्यांच्या वेळापत्रकावर पावसाचा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होती.
पावसामुळे उड्डाणे व बससेवा उशिरा धावल्याने विमानतळ व बसस्थानकांवर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. वारंवार पावसामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था ठप्प होते, हे पुन्हा एकदा ( Heavy Rain) स्पष्ट झाले आहे.