situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: ‘ज्येष्ठांमधील एकाकीपणा – कारणे आणि उपाय’ विषयावर चर्चासत्र

Published On:
Pune

ज्येष्ठत्व जीवनाचा सुवर्णकाळ; मध्यम मार्ग स्वीकारा
शरीराप्रमाणे मनाची निगा राखणे आवश्यक

Team My pune city –ज्येष्ठत्व हा जीवनाचा सुवर्णकाळ आहे, असे मानून जगायला शिकले पाहिजे. (Pune)मध्यम मार्ग स्वीकारात ‘जिथे कमी तिथे आम्ही’ हे धोरण अवलंबावे. दुराग्रह, हट्टी, हेकेखोरपणा सोडून तडजोड करण्याचे धोरण स्वीकारावे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत नवनव्या ओळखी करून घेणे, मित्रमंडळीत मिसळणे, क्षमाशील वृत्ती, नामस्मरण, योग, अध्यात्म यांचा अंगीकार केल्यास ज्येष्ठांमध्ये एकाकीपणा निर्माण होणार नाही तर कुणीतरी आपली वाट बघते आहे याचे समाधान मिळेल, असा सूर ‘ज्येष्ठांमधील एकाकीपणा – कारणे आणि उपाय’ या चर्चासत्रात उमटला.

ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करीत असलेल्या ऑल आयकॉनिक सिनियर सिटिझन्स असोसिएशनतर्फे सोमवारी (दि. १८) पूना गेस्ट हाऊस येथे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. दिलीप देवधर, डॉ. अमित मुंगळे यांचा सहभाग होता. त्यांच्याशी डॉ. हिमाली सर्डेकर यांनी संवाद साधला. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अजित कुमठेकर यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

चर्चासत्राची सुरुवात रवींद्र शाळू यांनी सादर केलेल्या ‘हीच अमुची प्रार्थना अन्‌ हेच अमुचे मागणे’ या गीताने झाली.

डॉ. दिलीप देवधर म्हणाले, एकाकीपणा म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. एकाकीपण अथवा रिकामपण हे मुख्यत: अपत्य परदेशी अथवा दुसऱ्या गावी असणे किंवा जोडीदाराचा मृत्यू तसेच अपत्यांशी पटवून न घेणे यातून निर्माण होते. सतत दु:खी राहणे, वाईट वाटणे, झोप न येणे, भूक न लागणे, बेचैनी, नैराश्य ही एकाकीपणाची लक्षणे वेळीच ओळखून त्यातून बाहेर पडण्यासाठी ज्येष्ठांनी वृद्धत्व स्वीकारत नियोजन करणे आवश्यक आहे. मुलांकडून अपेक्षा न ठेवता मुलांना वाढविणे म्हणजे गुंतवणूक नाही हे लक्षात घेऊन वयाच्या पन्नाशीपासूनच वागण्यात थोडीशी अलिप्तता आणणे आवश्यक आहे. कर्तेपण गमावले म्हणजे नाकर्तेपण नाही हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉ. अमित मुंगळे म्हणाले, मन प्रसन्न असेल तर शरीर आपसुकच निरोगी राहते. ज्या प्रमाणे शरीराची निगा घेतो त्याप्रमाणे मनाची निगा राखणेही आवश्यक आहे. माझे कुणी नाही, माझा कुणाला उपयोग नाही हे निराशावादी सूर न काढता आपल्या आयुष्यातील चांगल्या आठवणींमध्ये रमणे तसेच संवाद, संगीतोपचार, नृत्योपचार यातून एकाकीपणावर मात करता येऊ शकते. सोडून द्यायला शिकणे आणि आहे त्याचा स्वीकार करणे साधल्यास ज्येष्ठांमधील एकाकीपण दूर होईल.

Local train : पुणे ते लोणावळा दरम्यान दुपारी लोकल सुरु करणे शक्य नाही – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

River Pollution : इंद्रायणी व पवना नदी प्रदूषणामुक्तीसाठी पुढाकार!

या निमित्ताने ‘श्रावण सरी’ हा हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘मी डोलकर डोलकर’, ‘हृदयी वसंत फुलताना’, ‘अग पोरी सांभाळ’, ‘आज रपट जाए’, ‘रिमझिम के गीत सावन गाए’, ‘आज कल तेरे मेरे प्यारके’, ‘प्यार हुआ इकरार हुआ’ आदी गीते रवींद्र शाळू, सुनीला कवितकर, कल्पना क्षत्रिय, सुहास घोडके, शीतल वाघ, स्मिता सोळंकी यांनी सादर केली.

माजी महापौर प्रशांत जगताप, डॉ. किशोर सरपोतदार यांनी स्वागत केले.

Follow Us On