Team My Pune City – गेल्या वर्षीच्या पुण्यातील गणेशोत्सवात( Ganeshotsav) शहरातील विविध गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) पुणे पोलिस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावत कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Pune Crime News : सहकारनगरमध्ये दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र हिसकावले
गेल्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी एनजीटीने गणेशोत्सवातील( Ganeshotsav) ध्वनिप्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील 200 गणेश मंडळांच्या ठिकाणी 7 ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत दररोज सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत आवाजाची पातळी मोजली होती. यात मध्यवर्ती भागांबरोबरच उपनगरांतील मंडळांचाही समावेश होता. तपासणीत आवाजाची पातळी 70 ते 85 डेसिबलपर्यंत नोंदवली गेली. ही पातळी कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले होते.
Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
तथापि, ध्वनिप्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळांची यादी ( Ganeshotsav) उत्सवानंतर जाहीर करणे अपेक्षित होते, परंतु ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे डॉ. कल्याणी मांडके यांनी एनजीटीकडे याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेत, पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायाधिकरणाच्या मागील वर्षी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सुनावणीदरम्यान न्यायाधिकरणाने पोलिसांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबतची सर्व माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी घेतलेल्या नोंदींमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या ध्वनिप्रदूषणाची पातळी नोंदवलेली नव्हती. त्यामुळे कारवाईत झालेल्या त्रुटी व दुर्लक्षावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले ( Ganeshotsav) आहे.