Team My pune city – पिंपरी-चिंचवड आम आदमी पार्टी तर्फे सामाजिक ( Dahi handi )आणि शैक्षणिक उपक्रम राबवत दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गोविंदा पथकांची दही हंडी साजरी करण्यात आली.
Metro : भक्ति-शक्ति ते चाकण मेट्रोचा डिपीआर तयार
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आप महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके, युवा आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धेश भगत, महाराष्ट्र राज्य समन्वयक अमित म्हस्के, युवक प्रदेश अध्यक्ष मयूर दौंडकर उपस्थित( Dahi handi ) होते.
Metro : भक्ति-शक्ति ते चाकण मेट्रोचा डिपीआर तयार
वेगवेगळ्या गोविंदा पथकांनी दहीहंडीसाठी थर लावले. आपचे राष्ट्रीय संयोजक, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस यानिमित्त साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष रविराज काळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर ( Dahi handi )केली.
Rashi Bhavishya 18 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
त्यानुसार मुक्ताबाई रामचंद्र बालवडकर यांच्या स्मरणार्थ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती रसिका गायगोले हिला तर शंकर नारायण घोडके यांच्या स्मरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती सुरज सोमुसे आणि सुजल जौजालकर हिला देण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती लाभली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी, नव्या पिढीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे रविराज काळे यांनी ( Dahi handi ) सांगितले.