Team My Pune City – सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीन (Chakan)च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. २० ते २६ वर्ष वयोगटातील या टोळीतील आरोपींकडून १२ लाखा ३१ हजारांचे १० तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
धक्कादायक म्हणचे याच टोळीकडून अहिल्यानगरमधील सुपा येथे सोनसाखळी हिसकावताना मे महिन्यात महिलेचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल होता. याच टोळीचे एकूण वेगवेगळे १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हे शाखा युनिट ३ पोलिसांनी याप्रकरणी( Chakan) अक्षय राजू शेरावत, ऋषी बुद्धिमान नानावत, अरमान प्रल्हाद नानावत आणि सोनू फिरोज गुडदावत यांना महाळुंगे एमआयडीसी भागातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान चोरीतील सोनसाखळी, सोन्याचे दागिने विकत घेणारा सराफ खुशालसिंग जोधसिंगराव याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
Vadgaon Maval: वारंगवाडीत परंपरागत गोकुळाष्टमी साजरी
Pimpri Chinchwad Crime News 17 August 2025 : तलाक न दिल्याने महिलेवर खुनी हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी हे पादचारी एकट्या महिलेला हेरून तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढत असायचे. आत्तापर्यंत पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, पिंपरी- चिंचवड परिसरात सोनसाखळी हिसकावल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दरम्यान, २० मे २०२५ रोजी अहिल्यानगर सुपा येथे आरोपी अक्षय आणि ऋषी नानावत यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना महिला रस्त्यावर पडून गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.
त्यांना सुपा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. चार ही आरोपींना महाळुंगे एमआयडीसी परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जावळे, राजाराम लोणकर, योगेश आढारी व त्यांच्या सहकार्यांच्या पथकाने केली आहे.