Team My Pune City – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील(Chakan) महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये पालेभाज्यांची मोठी आवक झाली. मात्र पावसाने भाज्या भिजल्याने दरात मोठी घसरण झाली. तरकारी मालासह रताळी, हिरवी मिरची, टोमॅटो व कांद्याची प्रचंड आवक झाली. चाकणला भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ३ कोटी ६० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १०० क्विंटलने वाढूनही कांद्याच्या भावात २०० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव १,५०० रुपयांवरून १,७०० रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने घटल्याने बटाट्याच्या भावात २०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव १,८०० रुपयांवरून २,००० रूपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक ३५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १० क्विंटलने वाढली मात्र लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.
Vadgaon Maval: वारंगवाडीत परंपरागत गोकुळाष्टमी साजरी
Pimpri Chinchwad Crime News 17 August 2025 : तलाक न दिल्याने महिलेवर खुनी हल्ला
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३२५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. हिरव्या मिरचीला ५ हजार रुपयांपासून ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे
कांदा – एकूण आवक – १,००० क्विंटल.भाव क्रमांक – १.१,७०० रुपये, भाव क्रमांक २.१,३०० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये.
बटाटा – एकूण आवक – १,२५० क्विंटल.भाव क्रमांक १.२,००० रुपये, भाव क्रमांक २.१,६०० रुपये,भाव क्रमांक ३.१,२०० रुपये.
फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – ३४४ क्विंटल (१,५०० ते ३,००० रू.),कोबी – ३४५ क्विंटल (४०० ते ६०० रू.),फ्लॉवर – १९५ क्विंटल (१,००० ते २,००० रु.), वांगी – ११० क्विंटल (१,००० ते २,००० रु.), भेंडी – १०८ क्विंटल (१,००० ते २,००० रु.), दोडका – ७८ क्विंटल (२,००० ते ३,००० रु.), कारली – १०४ क्विंटल ( १,५०० ते २,५०० रु.), दुधीभोपळा – ९० क्विंटल (१,००० ते २,००० रु.), काकडी – १२० ( क्विंटल (१,००० ते २,००० रु.), फरशी – ७८ क्विंटल (२,५०० ते ३,५०० रु.), वालवड – ९० क्विंटल (२,००० ते ३,००० रुपये), ढोबळी मिरची – १७४ क्विंटल (२,५०० ते ३,५०० रु.),चवळी – ५५ क्विंटल (१,५०० ते २,५०० रु.), वाटाणा – ९५ क्विंटल ( ६,००० ते ७,००० रू. ), शेवगा – ६० क्विंटल (२,५०० ते ४,५०० रु.), गाजर – २३५ क्विंटल (२,५०० ते ३,५०० रु.), गवार – ८४ क्विंटल (३,००० ते ५,००० रु. ), आले – १८० क्विंटल ( २,५०० ते ३,५०० रु. ), रताळी – ६० क्विंटल ( २,००० ते ३,००० रु. ).,
पालेभाज्या –
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण १८ हजार ४४० जुड्या (७०० ते १,२०० रुपये ), कोथिंबीर – एकूण २७ हजार ९०० जुड्या (३०० ते ५०० रुपये,), शेपू – एकूण ६ हजार ३२० जुड्या (४०० ते ६०० रुपये ), पालक – एकूण ४ हजार १०० जुड्या (४०० ते ७०० रुपये),.
जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८५ जर्सी गाईंपैकी ५५ गाईंची विक्री झाली. ( १५,००० ते ७०,००० रु. ), ११० बैलांपैकी ७० बैलांची विक्री झाली. ( १०,००० ते ४०,००० रु. ), ६० म्हशीं पैकी २५ म्हशींची विक्री झाली. ( ३०,००० ते ८०,००० रु. ), ५,१०० शेळ्या – मेंढ्यापैकी ४,८०० शेळ्यांची विक्री झाली असून त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.