Team My Pune City – एका २२ वर्षीय तरुणीवर तिच्या पतीने तलाक न दिल्याच्या रागातून ब्लेडने वार करीत खुनी हल्ला केला. ही घटना थेरगाव येथील (Pimpri Chinchwad Crime News 17 August 2025)एम एम चौकात शनिवारी (दि. १६) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
सलमान रमजान शेख (वय २९, रा. रोहन वाईन्स मागे, विजयनगर, काळेवाडी, पुणे) आणि हुजेफा आबेद शेख (वय २७, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, मूळ रा. वाहेगाव, ता. गेवराई, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याबाबत नाणेकर चाळ, भारतनगर, पिंपरी येथील २२ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली सून तिने याबाबत काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
Talegaon Dabhade News : श्री गणेश तरूण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कामावर असताना आरोपी मोटारसायकलवरून घटनास्थळी आले. आरोपी सलमान याने “तलाक का देत नाहीस” या कारणावरून तसेच फिर्यादीच्या कामावरील सहकाऱ्यांसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन तिच्या गळ्यावर व हातावर ब्लेडने वार केले. प्रतिकार करताना तिच्या डोक्यावर, गालावर व कानामागेही वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.
चिंचवडमध्ये दोन बांग्लादेशी नागरिक अटकेत
रिव्हरह्यू हॉटेलमध्ये बांग्लादेशातून भारतात बेकायदेशीर प्रवेश करून राहणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चिंचवडगाव येथील थेरगाव विसर्जन घाटाजवळ ही कारवाई करण्यात आली.
सुनांदो कुमार नितायचंद दास (वय ३५, मुळ रा. हसमदिया, भांगा नगरपालिका, जि. फरिदपुर, बांग्लादेश) व अमित विश्वजित मंडल (वय २५, मुळ रा. तेघरीहुडा, उपजि. कालीगंज, जि. झेनाईदाह, बांग्लादेश) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार संतोष डोंगरु उभे यांनी शनिवारी (दि. १६) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी २०१९ व २०२४ पासून भारतात बेकायदेशीररित्या राहात होते. विशेष म्हणजे आरोपी अमित विश्वजित मंडल याने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र तयार करून स्वतःला भारतीय दाखवले होते. हे कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणाचा तपास चिंचवड पोलीस ठाणे करीत आहे.
सिगारेटच्या धुरावरून टोळक्याकडून हाणामारी
सिगारेटच्या धुरावरून झालेल्या किरकोळ वादातून टोळक्याने एका तरुणाला गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. १५) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास थेरगाव येथे घडली.
अक्षय महादेव परदेशी (वय २९, रा. गणेशनगर, दुर्गा कॉलनी, थेरगाव, ता. मुळशी, जि. पुणे) व रोहित महादेव नलावडे (वय १९, रा. गणेशनगर, दुर्गा कॉलनी, थेरगाव, ता. मुळशी, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तसेच तीन अल्पवयीन मुलांनाही समजपत्र देवून नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. प्रतीक लक्ष्मण दळवी (वय २३, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी, पुणे) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी शनिवारी (दि. १६) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी यांच्यात सिगारेटच्या धुरावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून गजाने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्यासह शरीरावर गंभीर व किरकोळ जखमा झाल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.
दुचाकीची कंटनरला धडक; दोघांचा मृत्यू
भरगाव वेगातील दुचाकीने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना महाळुंगे एमआयडीसी परिसरात शुक्रवारी (दि. १५) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
भानुप्रताप उजागर सिंह (वय ४१) व रविंद्र अशोक गुप्ता (वय २०) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. विष्णु नित्यानंद तिवारी (वय २६, रा. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दुचाकी चालकाचे नाव आहे. विवेक मोतीचंद मुलगा (वय २७, रा. आंबेगाव, पुणे) यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे दोन दाजी आरोपी चालवत असलेल्या दुचाकीवर बसले होते. आरोपी तिवारीच्या निष्काळजी भरधाव वेगातील दुचाकी कंटेनरला पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाला. आरोपी तिवारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
पिंपरीत गांज्यासह तरुणास अटक
पिंपरी भाजी मंडईजवळ २६० ग्रॅम गांज्यासह एका तरुणास अटके करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १६) दुपारी करण्यात आली आहे.
गोपाल माणिक मोरे (वय २६, रा. श्रीगणेश हो. सोसा., न-हेगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गोविंद देवराव डोके यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोरे याच्याकडे ६३ हजार रुपये किमतीचा गांजा विक्रीसाठी घेऊन फिरत असताना त्यास संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६३ हजारांचा गांजा हस्तगत केला. या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
मेफेड्रोनसह विद्यार्थी अटकेत
पोलिसांनी केलेल्या कारवाईत मेफेड्रोनसह एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. १६) सायंकाळी पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात करण्यात आली.
अधर्व काशिनाथ जाधव (वय १९, रा. टिंगरेनगर, पुणे) असे आरोपीचे नाव असून सध्या तो शिक्षण घेत आहे. पोलीस नाईक जावेद शहाबुद्दीन मुजावर यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव हा ७० हजार रुपये किमतीचा ७१५ ग्रॅम मेफेड्रोन बाळगताना मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणाचा तपास संत तुकारामनगर पोलीस करीत आहेत.
देशी बनावटीच्या पिस्तुलासह तरुणास अटक
देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतूसासह तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १६) संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास संत तुकारामनगर परिसरात करण्यात आली.
अनिरुद्ध संतोष टेकाळे (वय २१, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार संतोष भानुदास रजपुत यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकाळे हा ५० हजार रुपये किमतीचे पिस्तुल व ५०० रुपये किमतीचे जिवंत काडतूस विनापरवाना बाळगताना मिळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास संत तुकारामनगर पोलीस करीत आहेत.