Team My Pune City –नगरपरिषद आळंदी तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या(Alandi) शुभप्रसंगी प्रलंबित वारसा नियुक्ती प्रकरणाला न्याय देण्यात आला आहे.
पंकज खैरे यांना नियमानुसार लाड पागे वारसा नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांचे आजोबा पुंजा मोहन खैरे हे १९८७ साली सफाई कामगार पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य — मुलगा, सून तसेच नात-सून — यांनी वेळोवेळी अर्ज केले होते. तथापि, विविध कारणास्तव हे प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित राहिले.
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
Talegaon Dabhade News : श्री गणेश तरूण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न
शेवटी तब्बल ३८ वर्षांनंतर, आळंदी नगरपरिषदेचे (Alandi)मुख्याधिकारी तथा प्रशासक माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मयुरी पाटोदकर आस्थापना यांनी शासन निर्णय परिपत्रके यांचा सखोल अभ्यास करून त्यांचा प्रस्ताव तयार केला व पंकज खैरे यांना वारसा नियुक्ती देऊन न्याय देण्यात आले आहे.