Team My Pune City – आळंदीतील इंद्रायणी नदीच्या(Alandi) पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भागीरथी त्रिवेणी कुंड पाण्याखाली आहे.अश्यातच सकाळी सातच्या सुमारास एक तरुण आंघोळीसाठी नदी पात्रात उतरला होता.नदीपात्राचा अंदाज न आल्याने व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो तरुण तेथून वाहून गेला.
इंद्रायणी नदी मध्ये वय वर्ष २५ असलेला तरुण वाहून गेला आहे.तरुणाचे नाव नागेश रत्नपारखी आहे.तो ता.माजलगाव जि. बीड जिल्हयातील अशी माहिती सोशल मिडिया च्या माध्यमातून अरुण कुरे यांनी तसेच शशिकांत जाधव यांनी दिली.याबाबत आळंदी पोलीस स्टेशन यांना माहीती देण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने च-होली पर्यंतच्या नदी काठा पर्यंत त्याचा शोध घेण्यात आला.
Jyoti Chandekar: लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

जीवाची पर्वा न करता नदीपात्रात उतरून फोटो
पाण्याची पातळी वाढून ही नागरिक नदीपात्रात तसेच नदीपात्रातील दगडी घाटावर जात फोटो व सेल्फी घेताना दिसून येत आहे.तसेच काही जण नदीपात्रात स्नान करताना दिसत होते.तसेच काही नागरिक बेफिकीर पणे लहान मुलांना नदीपात्रात उतरवत फोटो काढताना दिसत होती.भक्ती सोपान पुलावरील संरक्षण कथडे आषाढी वारी वेळेस आलेल्या पुरा मुळे पडले .सद्यस्थितीत पाण्याची पातळी वाढली असून तेथील पुला वर अनेक नागरिक जात फोटो,सेल्फी घेत आहेत.
याची दखल घेत प्रशासनाने नदी घाटावर योग्य ती उपाय योजना करणे आवश्यक आहे.