Team My Pune City – राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा (Alandi)करण्यात आला.आळंदी मध्ये श्रीकृष्ण प्रतिष्ठाण यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.दहीहंडी उत्सवावेळी दहीहंडीस आकर्षक फुलसजावट करण्यात आली.
तसेच यावेळी अनेक गोविंदा नी डीजे च्या गाण्यावर नृत्य केले. प्रथम शिवसत्ता ग्रुप,डी एक्स ग्रुप व धर्मराज ग्रुप आळंदी गावठाण यांनी दहीहंडीस सलामी दिली.दहीहंडी उंचावर असल्याने तिन्ही ग्रुपचे दोन तीन प्रयत्न झाले.
दरम्यान रात्रीच्या वेळेच्या बंधना नुसार अखेर दहीहंडी वेळोवेळी काहीश्या प्रमाणात खाली घेण्यात आली होती.तद्नंतर धर्मराज ग्रुप आळंदी गावठाण यांना प्रथम संधी मिळाल्या नंतर त्यांनी ती दहीहंडी रात्री दहाच्या सुमारास फोडली.तद्नंतर श्रीकृष्ण प्रतिष्ठाण यांनी धर्मराज ग्रुप आळंदी प्रतिष्ठाण आळंदी गावठाण यांना दहीहंडी उत्सव २०२५ विजेता चषक व बक्षीस दिले.
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
Talegaon Dabhade News : श्री गणेश तरूण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न
दहीहंडी उत्सवा निमित्त काही लहान मुले राधा श्रीकृष्णाचा वेश परिधान करून आले होते.त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.भराव रस्ता ते मंदिर परिसरात हजारो नागरिकांनी हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली होती.तसेच आळंदी ठिक ठिकाणी बाल गोपाळांनी दहीहंडीचे आयोजन केले होते.
त्यामध्ये माऊलीं पार्क बाल मित्र मंडळाने दहीहंडी चे आयोजन केले होते.तेथील गोविंदा पथकाने सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दहीहंडी फोडली. यावेळी दहीहंडी च्या गाण्यावर अनेक लहान मुलांनी नृत्य केले.