Team My Pune City –सोहम् सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका यांच्या (Pimpri)वतीने शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी संत तुकारामनगर, पिंपरी येथे ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग उपायुक्त पंकज पाटील, फ विभाग साहाय्यक आयुक्त अतुल पाटील, महानगरपालिका ग्रंथालय विभाग प्रमुख प्रतिभा कुमावत, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चाबुकस्वार, ज्ञानेश्वर कांबळे आणि सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची प्रमुख यावेळी उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झेंडावंदन संपन्न झाले. याप्रसंगी पंकज पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती देऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले; तसेच प्रसन्न व शांत वातावरण आणि स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी सर्व ग्रंथसंपदा अन् वातानुकूलित अभ्यासिका असलेले सोहम् सार्वजनिक ग्रंथालय हे पिंपरी – चिंचवडमधील एक परिपूर्ण ग्रंथालय व अभ्यासिका असून त्याचा विद्यार्थ्यांनी योग्य तो उपयोग करून यशस्वी व्हावे, असे आवाहन केले.
Akurdi Crime News : आकुर्डी येथे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
Talegaon Dabhade News : श्री गणेश तरूण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन २०२५ – २०२६ चा अहवाल प्रकाशन सोहळा संपन्न
जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी आभार मानले. स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी यांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
