Team My pune city –काल ( दि.१५ ऑगस्ट) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सवानिमित्त सुवर्ण कलशारोहणाचे आयोजन ( Devendra Fadnavis)करण्यात आले. माऊलीं मंदिर येथील महाद्वार जीर्णोद्धारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन सोहळा पार पडला. तद्नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण कलशाचे पूजन करण्यात आले.
शांतीब्रम्ह मारोती बाबा कुरेकर, डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या शुभहस्ते हे कलशारोहण करण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान दुभाषिक ज्ञानेश्वरीचे ऑडिओ बुक प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रथम भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपले स्वातंत्र्य चिरायू होवो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ,आज जन्माष्टमीचा दिवस ( Devendra Fadnavis)आहे. योगेश्वर श्रीकृष्णाला आपण पूर्ण अवतार मानतो. या कुरुक्षेत्राच्या क्षेत्रामध्ये अर्जुन लढायला तयार नव्हता. धर्म युद्ध मी लढू शकत नाही असे तो सांगत होता,त्यावेळी विश्वरूप दर्शन देत ,जगातील सर्वात मोठं ज्ञान भगवतगीता योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितली. त्याच पवित्र दिवशी ही गीता सामान्यातल्या सामान्य पर्यंत मराठीत माऊलींनी पोहचवली. हे वैश्विक ज्ञान सामान्य माणसा पासून दूर होते ते त्याच्या पर्यंत पोहचवले. त्या माऊलींच्या कलशाचे सुवर्ण कलशा आरोहण होत आहे. येथील जे विश्वस्त आहेत , ती नवीन पिढी आहे.सगळे सुशिक्षित आहेत. लौकिक ज्ञानासोबत अध्यात्मिक ज्ञान देखील यांनी प्राप्त केले आहे.
वारकरी संप्रदायाची जी मूल्ये आहेत त्या मूल्यानुरुप काम करण्याचा( Devendra Fadnavis) प्रयत्न करणारे असे सगळे विश्वस्त याठिकाणी लाभले आहे. यामुळे इतके चांगले सुवर्ण कलशाचे काम होऊ शकले. सुवर्ण कलशाची नुसती घोषणा झाली अनेक दानशूर व्यक्ती पुढे आली. आप आपल्या परीने दान दिले.याला दान म्हणे योग्य नाही हे समर्पण आहे. प्रत्येकाने आपले समर्पण दिले.या समर्पणातून सुवर्ण कलश उभा राहिला. योगी निरंजनाथ यांनी सांगितले देशामध्ये बोटावर मोजणारी मंदिरे आहेत, ज्या ठिकाणी संपूर्ण सुवर्णाचा कलश आहे.त्यामध्ये आळंदीच्या माऊलींच्या मंदिराची भर पडली.ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे.
मुख्य द्वार आहे त्याचे पुनरुज्जीवन करण्या करता भूमीपूजन केले ( Devendra Fadnavis)आहे. छत्रपती शिवरायांनी तयार केलेले हिंदवी स्वराज्य ज्यावेळी पानिपतच्या लढाई नंतर पूर्णपणे घायाळ होते.अनेकांना वाटायचे मराठा साम्राज्याचा अस्त झाला.हे साम्राज्य पुन्हा उभे राहू शकत नाही.अश्या काळामध्ये पुन्हा एकदा त्या साम्राज्याला जोर देत केवळ दहा वर्षा मध्ये दिल्ली मध्ये दिल्लीचे तख्त जिंकणारे महादजी शिंदे होते.यांच्या महाद्वाराचे देखील आज भूमिपूजन झाले आहे.पुनर्निर्माणामुळे महाद्वाराला सौंदर्य प्राप्त होईल.
Vadgaon Maval : सामाजिक कार्यकर्ते अशोक घोजगे यांचे निधन
जे ऑडिओ बुक निर्माण केले आहे त्याचे मनापासून आभार( Devendra Fadnavis) मानतो. जे गीतेचे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान खऱ्या अर्थाने जगातील सर्वोत्तम तत्वज्ञान आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ही हे तत्वज्ञान स्वीकारले जात आहे.त्या तत्वज्ञानाला नऊ हजार ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यां पर्यंत माउलींनी पोहचवले.आणि त्याला अगदी सोप्या शब्दां मध्ये त्यातील तत्वज्ञान पसायदानाच्या माध्यमातून आणले.ते सर्व भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.
या देशात अनेक वेळा राजकीय गुलामगिरी स्वीकारावी( Devendra Fadnavis) लागली. अनेकांनी आक्रमण करून राजकीय गुलाम केले. आमच्या सांस्कृतिक मुल्यांना कोणीही गुलाम करू शकले नाही. आमच्या कडे इतकी मोठी सांस्कृतिक परंपरा होती ज्या ज्या वेळी आमच्यावर आक्रमण झाले, या सांस्कृतिक परंपरेने आमचे विचार व मूल्य जिवंत ठेवली.त्याचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजे तो आमचा वारकरी संप्रदाय आहे.ज्या वारकरी संप्रदायाने वारकरी, भारतीय मूल्य ,हिंदू तत्वज्ञान ,सनातन धर्म ही प्रत्येकाची मूल्ये जोपासून पुढच्या पिढी पर्यंत नेली.राजकीय गुलामगिरी आली परंतु वैचारिक गुलामगिरी स्वीकारली नाही.म्हणूच आज भारत जगातील सर्वात जुनी आणि सातत्याने चालणारी सभ्यता आहे.
भारता मध्ये वेग वेगळ्या प्रकारचे संशोधने केल्यानंतर आठ ,( Devendra Fadnavis)नऊ हजार वर्षा पूर्वीची शहरे सापडतात. ज्यामध्ये पूर्ण रूपाने विकसित अश्या प्रकारची नगर त्याठिकाणी सापडतात. बहुमजली इमारती ,ड्रेनेज व्यवस्था, मोठं मोठे रस्ते आहेत. ज्यावेळी जगाला संस्कृती काय आहे माहीत नव्हते त्यावेळी भारतात ती सांस्कृतिक चेतना जिवंत होती.
जे काही सनातन सांगितले आहे त्याचा सनातचा अर्थ काय आहे? सनातनचा अर्थ आहे जे कधीच संपवू शकत नाही जे नेहमी चालत राहते,जे पुण्य पुरातन आहे नित्यनूतन आहे जे प्रवाहा सारखे आहे जो प्रवाह थांबवू शकत नाही .असा जो प्रवाह आहे त्यातील पाणी निरंतर शुद्ध होत असते,अश्या प्रकारची असलेली सनातन संस्कृती आहे.
वेगवेगळ्या गटांमध्ये खंडित झालो,वेगवेगळ्या जाती प्रथा मध्ये विभाजित झालो ,मनुष्या मध्ये भेद करायला लागलो त्या त्यावेळी गुलामगिरी मध्ये गेलो.त्या त्यावेळी संतांनी शिकवण दिली आपल्याला एकत्रित राहायचे आहे. संतांची शिकवण ,संपूर्ण वारकरी परंपरा पाहिली, तर ही परंपरा अशी आहे, वारकरी वारकऱ्यांमध्ये पांडुरंग पाहतो.तो त्याची जात पाहत नाही. श्रीमंत ,गरीब पाहत( Devendra Fadnavis) नाही.तो त्याच्या पायांना दंडवत करतो.
ज्ञानेश्वर माऊलींना संन्याश्याची मुले म्हणून हिणवले गेले. त्या त्या वेळच्या समाजाने अनेक प्रश्न उभे केले.या प्रश्नांमध्ये जेव्हा समाज विभाजित झाला. त्या त्यावेळी गुलामगिरी कडे गेलो.तेव्हा संतांनी सांगितले आपल्याला एकत्रित राहावे लागेल. तरच एकत्रित विकास करू शकू,
चांगला समाज तयार करू शकतो. हीच संतांची शिकवण शाश्वत शिकवण आहे. माऊलींची शिकवण देखील तीच शिकवण आपल्याला मिळाली आहे. माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून कुठल्या व्यक्ती, परीवारा ,वैष्णवा करता दान मागितले नाही.संपूर्ण विश्वा करता दान मागितले आहे. ही विचार करण्याची श्रीमंती आहे. ती माऊलींच्या ठायी दिसते.संतांच्या ठायी ( Devendra Fadnavis) दिसते.