Team My pune city – कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवा निमित्त दि.१५ रोजी आळंदी (Alandi) येथील पवित्र संजीवन समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सोहळ्याची सुरुवात महाद्वार पूजनाने होणार असून, हे पूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यानंतर दर्शन व पूजन दुपारी २.४० ते २.५५ या वेळेत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पुढे, मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलश पूजन दुपारी २.५५ ते ३.१५ या वेळेत होईल, तर कलशारोहण ३.१५ ते ३.३० या वेळेत विधिवत पार पडेल.
Crime News : कुनेगाव हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणातून तरुणाला मारहाण
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी व विश्वस्त चैतन्य महाराज कबीर करतील. प्रास्ताविक प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ सादर करतील. या प्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. तसेच सोहळ्यासाठी बहुमोल देणगी देणाऱ्यांचा प्रतिनिधी स्वरूपात सत्कार केला जाईल. काही विशेष सहकार्य करणाऱ्यांचा यावेळी स्वतंत्रपणे गौरव करण्यात (Alandi) येईल.
कार्यक्रमा दरम्यान दुभाषिक ज्ञानेश्वरीचे ऑडिओ बुक प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. आभार प्रदर्शन विश्वस्त रोहिणीताई पवार करतील, तर विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे ‘पसायदान’ सादर करून कार्यक्रमाची सांगता करतील.
हा सोहळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या स्मृतीला आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेला अभिवादन करणारा ऐतिहासिक क्षण ठरणार Alandi) आहे.