Team My Pune City – पुणे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून ( PMC) जाहीर करण्यात आलेल्या “गुणोल्लेख अग्निशमन सेवा पदक” पुरस्कारासाठी पुणे महापालिका अग्निशमन दलातील चार शूर अधिकारी पात्र ठरले आहेत. यामध्ये देवीनगर अग्निशमन केंद्राचे ड्युटी ऑफिसर सुभाष प्रकाशराव जाधव, फायर इंजिन ड्रायव्हर रामचंद्र तुकाराम गोमाते, तसेच फायरमन ध्यान ताराचंद मोरे यांचा समावेश आहे. त्यांच्या शौर्यपूर्ण व कर्तृत्ववान सेवेला मान्यता देत 15 ऑगस्ट रोजी पदक जाहीर करण्यात आले.
Pune Crime News : चार सराईतांच्या ताब्यातून देशी बनावटीची चार पिस्तुले, पाच काडतुसे जप्त
ड्युटी ऑफिसर सुभाष जाधव यांनी 1999 पासून अग्निशमन सेवेत ( PMC) रुजू होऊन गेल्या 24 वर्षांत अनेक धाडसी मोहिमा यशस्वी केल्या आहेत. 2012 मधील बजाज शेरी यथील सिलेंडर स्फोट, विविध ठिकाणी लागलेल्या आगी, व जीवित हानी रोखण्यात त्यांनी दाखवलेले धैर्य उल्लेखनीय आहे.
फायर इंजिन ड्रायव्हर रामचंद्र गोमाते 1999 पासून सेवेत असून 2012 मधील महत्त्वाच्या आगीच्या घटनांपासून ते अलीकडील मोहिमांपर्यंत त्यांनी अनेक जीव धोक्यात ( PMC) घालून वाचवले आहेत.फायरमन ध्यान मोरे यांनी 2011 पासून सेवेत प्रवेश केला. माळवाडे फाट्यातील भीषण आग, श्रीगोंदा येथील गॅस टँकर स्फोट अशा अनेक घटनांत त्यांनी दाखवलेली तत्परता व कार्यकुशलता लक्षणीय आहे.
पदक जाहीर झाल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी समाधान व्यक्त करताना म्हटले, “अग्निशमन दलातील शौर्यवान अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींकडून गौरव मिळणे हा अभिमानाचा क्षण असून यामुळे दलातील सर्वांना कार्याची प्रेरणा मिळेल.”हे पदक मिळाल्यामुळे पुणे महापालिका अग्निशमन दलाच्या सेवाप्रवणतेचा व धाडसाचा लौकिक अधिक उजळला ( PMC) आहे.