Team My Pune City – पुणे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती ( Pune Crime News ) रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत गुन्हे शाखेच्या युनिट सहा पथकाने वाघोली परिसरात मोठी कारवाई करत चार सराईतांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीची चार पिस्तुले आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली. नगर रस्त्यावरील वाघोली येथे ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
Pimpri Chinchwad Crime News 14 August 2025 : चर्होलीत आर्थिक वादातून रॉडने मारहाण करून तरुणाचा खून
अटक करण्यात आलेल्यांची नावे ( Pune Crime News ) अशी आहेत – सूरज उर्फ नन्या संतोष मोरे (वय १९) आणि ओंकार अरुण नादवडेकर (वय १९, दोघे रा. गुलमोहोर पार्क, बकोरी फाटा, वाघोली, नगर रस्ता), तसेच जगदीश उर्फ जॅक शंकर दोडमणी (वय २४) आणि स्वयंम उर्फ अण्णा विजय सुर्वे (वय १९, दोघे रा. पांडू लमाण वस्ती, येरवडा).
मिळालेल्या माहितीनुसार, गस्त घालणारे पोलीस कर्मचारी नितीन घाडगे आणि निर्णय लांडे यांना भावडी रस्त्यावरील तळ्याजवळ मोरे आणि नादवडेकर थांबले असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले असता त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे एक पिस्तूल सापडले. चौकशीत त्यांनी आपल्या साथीदारांकडेही पिस्तुले असल्याची कबुली दिली.
यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत दोडमणी आणि सुर्वे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून आणखी तीन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली. अशा प्रकारे या कारवाईत एकूण चार देशी बनावटीची पिस्तुले आणि पाच काडतुसे हस्तगत करण्यात आली.
आरोपींनी ही पिस्तुले कुणाकडून घेतली, तसेच ती बाळगण्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, नितीन घाडगे, निर्णय लांडे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे आणि शेखर काटे यांनी ( Pune Crime News ) केली.