situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sameer Kulkarni : काँग्रेसला हद्दपार करणे हेच प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य असावे – समीर कुलकर्णी

Published On:
Sameer Kulkarni

  • भगवा आतंकवाद हे षडयंत्र तत्कालीन काँग्रेस सरकारचेच
  • समीर कुलकर्णी यांचा घणाघात
  • हिंदुधर्म कधीही पराजित होणार नाही

Team My pune city – भगवा आतंकवाद हे पुराव्याशिवाय ( Sameer Kulkarni )केले गेलेले भारताच्या इतिहासातील एक मोठे षडयंत्र होते, हे षडयंत्र तत्कालीन काँग्रेस सरकारचेच असल्याचा घणाघाती गौप्यस्फोट मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निर्दोष मुक्तता झालेले समीर कुलकर्णी यांनी केला. धर्मपरायण राहून राष्ट्रकर्तव्य केल्यास हिंदुधर्म कधीही पराजित होणार नाही!’ असा ठाम विश्वास देखील त्यांनी मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे व्यक्त केला. सकल हिंदू समाज, पिंपरी – चिंचवड शहराच्या वतीने इतिहास संशोधक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘भगवा आतंकवाद ना कभी था… ना हैं… ना रहेगा…’ या विषयावर समीर कुलकर्णी यांची जाहीर प्रकट मुलाखत घेतली.

भगवा म्हणजे त्याग, शौर्य आणि संस्कृतीचे प्रतीक असल्याने पुरुषार्थ हा हिंदू समाजाचा आदर्श असून हिंदू समाजाने कधीही दहशतवादाचा मार्ग अंगीकारला नाही, परंतु निवडणूका डोळ्यापुढे ठेऊन गलिच्छ राजकारण करणाऱ्या भगवा आतंकवाद षडयंत्र रचणाऱ्या काँग्रेसला या देशातून हद्दपार करणे हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य असावे असे प्रतिपादन कुलकर्णी यांनी विस्तृत मुलाखतीच्या माध्यमातून केले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज श्री क्षेत्र देहू देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, चिंचवड देवस्थान विश्वस्त जितेंद्र देव महाराज व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

Pune Metro : १५ ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी पुणे मेट्रो धावणार

समीर कुलकर्णी पुढे म्हणाले की, शरद पवार यांची पंतप्रधानपदाची लालसा, मुस्लीम तुष्टीकरण, २००९ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात ( Sameer Kulkarni )नखशिखांत बुडालेला असल्याने मतदारांचे लक्ष विचलित करून मालेगाव बॉम्बस्फोट २००८ चे निमित्त साधून तत्कालीन सत्तारूढ काँग्रेस पक्षाने जाणीवपूर्वक हिंदू – मुस्लीम संघर्ष असे रूप देऊन भगवा दहशतवाद अशी संकल्पना रूढ करण्याचा प्रयत्न केला. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह निरपराध, निष्पाप हिंदू व्यक्तींना यांमध्ये गोवण्यात यावे यासाठी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, दिग्विजयसिंह, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे शीर्षस्थ नेतेमंडळी यांनी पोलीस खात्यावर दबाव आणला होता.

Devghar Enquiry : प्रदीप नाईक यांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांचे मोठे पाऊल – देवघर येथील अनधिकृत बंगल्यांबाबत मागवला चौकशी अहवाल!

पोलीस कोठडीत अमानुष मारहाण करीत मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, प्रवीण तोगडिया, इंद्रेशकुमार, श्री श्री रविशंकर यांचा बॉम्बस्फोट कटात सहभाग ( Sameer Kulkarni ) आहे, अशी साक्ष आम्ही द्यावी म्हणून अनेक अत्याचार आमच्यावर करण्यात आले. आपल्याच देशात निर्दोष असूनही १७ वर्षे प्रचंड अनन्वित हाल, अत्याचार सहन करूनही आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडलो नाही. नुकतीच आमची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे हा सत्याचा विजय आहे.२६/११ हल्ल्याला सुद्धा हिंदू दहशतवाद दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न केला गेला पण हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यामुळे हे षडयंत्र सर्वांसमोर आले. देशात सत्तांतर झाल्यामुळेच भगवा आतंकवाद हा डाग पुसला गेल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

भारतमाता, छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी, मनीषा लताड आणि सहकारी ( Sameer Kulkarni ) यांनी सुश्राव्य देशभक्तिपर गीतांचे प्रभावी सादरीकरण केले. समीर कुलकर्णी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे देशभक्तिपर घोषणांनी श्रोत्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

कार्यक्रमाला आ.महेश लांडगे,आ.शंकर जगताप, आ.उमा खापरे, आ.अमित गोरखे, माजी आ.अश्विनीताई जगताप , भाजपाध्यक्ष शत्रुघ्न काटे, राहुल कलाटे यांचेसह अनेकविध लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष गायकवाड यांनी प्रस्ताविक, धनंजय गावडे यांनी सूत्रसंचालन तर कुणाल साठे यांनी आभार मानले. पूर्वांचलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात ( Sameer Kulkarni ) आली.

Follow Us On