Team My pune city – सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे ( Pratibha College)आजच्या घडीला सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे प्रोत्साहन व संस्थेच्या खजीनदार डॉ . भूपाली शहा , संचालिका डॉ तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. हर्षिता वाच्छानी यांच्या संयोजनाखाली प्रतीभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज व क्विक हिल फाऊंडेशन , “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर जनजागृती अभियान आयोजित केले जात आहे यामध्ये प्रतिभा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अग्निशमन दलात जनजागृती मोहीम राबवली.
Rashi Bhavishya 14 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
या मोहिमेअंतर्गत प्राधीकरण येथील आग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वाढत्या डिजिटल वापरासोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, प्रत्येकाने सजग राहून सुरक्षित इंटरनेटचा वापर करणे आवश्यक आहे, असा संदेश मोहिमेतून देण्यात आला.
कार्यक्रमात सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी पासवर्ड व्यवस्थापन, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, फिशिंग व व्हॉट्सअॅप फसवणूक टाळण्याचे उपाय, सरकारी व बँक संबंधित ( Pratibha College) फसवणूक ओळखण्याचे मार्ग अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच, प्रत्यक्ष उदाहरणे आणि व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना जागरूक केले. या मोहिमे अंतर्गत गायत्री गुंजालोर , फैसल इस्लाम, रोनित चौधरी व दुर्वा साळुंखे यांनी माहिती दिली.
Devghar Enquiry : प्रदीप नाईक यांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांचे मोठे पाऊल – देवघर येथील अनधिकृत बंगल्यांबाबत मागवला चौकशी अहवाल!
प्रकल्पाच्या समन्वयिका डॉ हर्षिता वाच्छानी , अध्यक्षा श्रावणी सावंत, सचिव आकाश ठाकूर, कार्यक्रम संचालक ऑलिव वर्गीस, व मीडिया डायरेक्ट मानसी वाडेकर.क्विक हिल सी एस आर एक्झिक्युटिव्ह अजय शिर्के, गायत्री केसकर, व दिपू सिंह यांचा मार्गदर्शना अंतर्गत कार्यरत आहे .या उपक्रमामुळे अग्निशमन दलातील सदस्यांमध्ये डिजिटल सुरक्षा जाणिवा अधिक दृढ झाल्या असून, ही मोहीम अत्यंत ( Pratibha College)यशस्वी ठरली.