Team My Pune City -कार्यक्षमता वाढविणे आणि सेवा विस्तार ( PMPML) साध्य करण्याच्या उद्देशाने, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) तर्फे परिसरात पाच नवे बस डेपो उभारण्यात येणार आहेत. रावेत, आकुर्डी, मोशी, चाकण आणि रांजणगाव येथे होणाऱ्या या डेपोमुळे विद्यमान 17 डेपोची संख्या वाढून 22 होणार आहे.
Rashi Bhavishya 13 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
चाकण आणि रांजणगाव येथील डेपोंसाठी जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) उपलब्ध करून देणार असून, बांधकामाचा खर्च पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) उचलणार आहे. हे डेपो सीएनजी व इलेक्ट्रिक दोन्ही प्रकारच्या बसेस हाताळण्यासाठी सक्षम असतील.
नव्या डेपोच्या उभारणीमुळे सुमारे 750 अतिरिक्त बसेसची वाहतूक ( PMPML) क्षमता उपलब्ध होईल, ज्याचा थेट लाभ अंदाजे सहा ते सात लाख प्रवाशांना होणार आहे. सध्या पीएमपीएमएल 1हजार 760 बसेसद्वारे दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांची वाहतूक करते. या सेवा 7 हजार 256 चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेल्या 385 मार्गांवर उपलब्ध असून, दररोज सुमारे 1.5कोटी इतके प्रवासी उत्पन्न मिळते.
Pune:श्री राघवेंद्र स्वामी यांच्या 354व्या आराधना महोत्सवाची रथोत्सवाने सांगता
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे( PMPML) यांनी सांगितले की, रावेत, आकुर्डी आणि मोशी येथील डेपो पीएमआरडीएने उपलब्ध करून दिलेल्या 5.5 एकर जमिनीवर उभारले जातील. हे डेपो पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत एका वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत.
अधिकाऱ्यांच्या मते, या विस्तारामुळे भोसरी आणि निगडी डेपोवरील ताण कमी होईल, प्रवासी नसताना होणारा “डेड किलोमीटर” प्रवास घटेल आणि पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांना जलद व विश्वासार्ह सेवा देणे शक्य ( PMPML) होईल.