situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 12 August 2025: खेड येथील पिकअप अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

Published On:

Team My Pune City –पिकअप गाडीच्या चालकाने निष्काळजीपणे गाडी (Pimpri Chinchwad Crime News 12 August 2025)चालवल्यामुळे झालेल्या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (११ ऑगस्ट) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास पापळवाडी ते कुंडेश्वर महादेव मंदिर डोंगराच्या पायथ्यालगत घडली. याप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिकअप चालक ऋषिकेश रामदास करंडे (२५, पापळवाडी, पाईट, ता. खेड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिध्दीका रामदास चोरघे (२१, पापळवाडी, पाईट, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शारदा रामदास चोरघे (४०), शोभा ज्ञानेश्वर पापळ (४५), सुमन काळुराम पापळ (४७), मंदा कानिफ दरेकर (५५), संजिवनी उर्फ संजाबाई कैलास दरेकर (५०), मिराबाई संभाजी चोरघे (५०), बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर (६५), शकुंतला उर्फ सखुबाई तानाजी चोरघे (५५), पार्वताबाई दत्तु पापळ (५५) आणि फसाबाई प्रभु सावंत (५५) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषिकेश करंडे याच्याकडे माल वाहतुकीचा परवाना असतानाही त्याने पिकअप गाडीत महिला आणि लहान मुलांना दाटीवाटीने बसवले होते. तो गाडी घेऊन पापळवाडीहून श्री क्षेत्र कुंडेश्वर महादेव मंदिराकडे जात असताना, तीव्र चढ आणि वळणांच्या घाटात डोंगराच्या पायथ्याशी गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी मागे घसरून रस्त्याच्या कडेला असलेल्या २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात १० महिलांचा मृत्यू झाला असून, इतर महिला व मुले गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.


दारू पिऊन गाडी चालवत अपघात, चालकावर गुन्हा दाखल

दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका तरुणाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. ही घटना सोमवारी (११ ऑगस्ट) रात्री बीटवाईज चौक, मोहननगर, बाणेर येथे घडली.

या प्रकरणी एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पार्थ प्रकाश पाटील (३२, मोहननगर, बाणेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा भाऊ अक्षय हा रात्री मित्राला भेटून बीएमडब्ल्यू दुचाकीवर घरी परत येत होता. त्यावेळी, बीटवाईज चौकात आरोपीने दारूच्या नशेत कार चालवत अक्षयच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात अक्षयच्या दुचाकीचे नुकसान झाले, तसेच त्याच्या डाव्या डोळ्यावरील कपाळाला मार लागून तो गंभीर जखमी झाला व बेशुद्ध पडला. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

PCMC: शाडू मातीच्या गणेश मूर्तींना नदी विसर्जनाची परवानगी द्यावी – माजी नगरसेवक विजय शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Lonavala:घरगुती गॅस टाकी चोरणारा चोरटा झाला गजाआड


भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक

निगडी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने दुचाकीला धडक दिली. ही घटना सोमवारी (११ ऑगस्ट) सायंकाळी सुभाष पांढरकर नगर, आकुर्डी येथे घडली.

याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक आनंद साळवी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद साळवी हे त्यांच्या मोपेड मोटारसायकलवरून बिजलीनगर ते निगडी रोडने घरी जात होते. संभाजी चौक, आकुर्डी येथे ते म्हाळसाकांत चौकाकडे वळण घेत असताना भेळ चौकाकडून येणाऱ्या एका टेम्पोने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत त्यांच्या मोपेडला समोरून धडक दिली. या अपघातात मोपेडचे नुकसान झाले असून आनंद यांना किरकोळ दुखापत झाली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


मेफेड्रॉन विक्री प्रकरणी तरुणाला अटक

उर्से गावाच्या हद्दीत मेफेड्रॉन (एमडी) विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला शिरगाव पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (११ ऑगस्ट) रोजी सायंकाळी फिनोलेक्स कंपनीसमोर करण्यात आली.

समेश राजू तिकोणे (२१, कान्हेफाटा, मावळ) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद जंगीलवाड यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्से गावातील फिनोलेक्स कंपनीजवळ एकजण एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून समेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे १ लाख १७ हजार ५०० रुपये किमतीचा ११.७५० ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.


भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू

भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या एका तरुणाचा अपघात झाला असून त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (९ ऑगस्ट) रात्री पिंपळे सौदागर येथील मॅक्स शोरूम समोर घडली.

वेदांत बबन मुसने (२३, वरुण पार्क सोसायटी, पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विजय थोरात यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत मुसने हा कोकणे चौकाकडून भोसरीच्या दिशेने केटीएम बाईक (एमएच २३/बीबी०७०७) भरधाव वेगाने चालवत जात होता. मॅक्स शोरूम समोरील बीआरटी विलगकच्या रेलिंगला दुचाकी धडकल्यामुळे त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On