Team My Pune City – महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी (Police Bhararti)आनंदाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवार (दि.12) झालेल्या बैठकीत तब्बल 14 हजार पोलीस पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता वेगाने पार पडणार असून, राज्यातील हजारो तरुणांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात या भरती प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिले होते. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलीस दलाला नवसंजीवनी मिळणार आहे. विविध संवर्गातील पदांचा यात समावेश असून, भरती प्रक्रिया पारदर्शक आणि जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सरकारने विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे.
PCMC: शाडू मातीच्या गणेश मूर्तींना नदी विसर्जनाची परवानगी द्यावी – माजी नगरसेवक विजय शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
Lonavala:घरगुती गॅस टाकी चोरणारा चोरटा झाला गजाआड
लवकरच भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यात अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता निकष, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखतींच्या तारखांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांनी आतापासूनच शारीरिक तयारी आणि अभ्यासाला सुरुवात करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, सरकारने ही प्रक्रिया जलद आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या मेगा भरतीमुळे बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.