Team My pune city –चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित ( Vandana Bokil)प्रतिभा महाविद्यालयातील महिला कल्याण समिती यांच्या वतीने व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत महिला विकास व सशक्तीकरण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन, संस्थेचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांचे प्रोत्साहन तसेच संस्थेच्या खजिनदार डॉ . भूपाली शहा व संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
त्यावेळी भाषा व साहित्य क्षेत्रातील विचारवंत डॉ . वंदना बोकील याचे स्त्री म्हणून जगताना या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी समवेत व्यासपीठावरती खेळ व फिटनेस क्षेत्रातील तज्ञ व प्रमुख पाहुण्या अभिश्री राजपूत, विभाग प्रमुख डॉ. अनामिका धोष , डॉ. रूपा शहा , कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. मधुरा वाघ आदी उपस्थित होत्या. यावेळी व्याख्यातांचा सत्कार प्रभारी प्राचार्या डॉ . क्षितीजा गांधी यांच्या हस्ते करण्यात आला .
Pratap Sarnaik: विद्यार्थ्यांच्या अनधिकृत वाहतुकीला अटकाव बसवण्यासाठी स्कूल व्हॅन परवाने करणार खुले, सरकारचा निर्णय
महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन (Vandana Bokil)करताना डॉ. बोकील पुढे म्हणाल्या, मुला मुलींनो तुम्ही तरुण आहात ,आज शिक्षण घेत असतानाच तुम्हाला समाजातील वास्तव्याची जाणीव व्हावी म्हणून सांगते,समाजात खूप सुधारणा झाली पण खरोखर झाली आहे का ? सुरक्षितता आहे का ? याचा विचार युवा पिढीने केला गेला पाहीजे . यासाठी दोन्ही बाजूनी काय केले पाहिजे याचा विचार करण्याची आज आवश्यकता आहे. मुलांना सुद्धा स्त्री म्हणून स्त्री ही माणूस आहे याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. तर मुलीना आपण स्त्री असलो तरी सुद्धा, आपण एक सक्षम माणूस आहे हे कळले पाहिजे. स्त्री म्हणून जगत रहाल तर भीती, दडपण यातच जगत रहाल. ही दडपणे प्रत्येक मुलीनी आधी मनातून दूर केली पाहिजे, असे सांगून डॉ. बोकील पुढे म्हणाल्या, स्त्री म्हणून जन्माला येत नाही, ती माणूस म्हणूनच जन्माला आलेली असते. तिची समाजात घडण एक स्त्री म्हणूनच होते. अमुक खेळायचे, ते खेळायचे नाही. ही कामे स्त्रीची, ती कामे पुरुषांची अशा प्रकारची विभागणी लहानपणापासूनच त्यांच्या मनावर पालकाकरवी , समाजातूनही मुला मुलीवर बिंबविली जाते. स्त्री पैसे न देणारी. कमी महत्त्वाची. म्हणून घर कामाला मोल नाही .आणि पुरुषांनी केलेली कामे पैसे मिळवून देणारे, मग ते प्रतिष्ठेची अशा प्रकारे समाजामध्ये स्त्री आणि पुरुष विषमता निर्माण झालेली आहे . युवा पिढीने विषमता दूर केली पाहीजे. पुढे भविष्यात हे व्हायला कल्पनांचा हातभार कसा लागतो, या अनुषंगाने त्या शेवटी अनेक दाखले देत मार्गदर्शन व आवाहन केले ..
खेळ व योग तज्ञ अभिश्री राजपूत म्हणाल्या, महिलांनी आपल्या आवडत्या खेळाच्या माध्यमातून आपला आत्मविश्वास व स्वतःची ओळख निर्माण करावी. करिअरही निर्माण करावे .शेवटी स्वतः अनुशासन, शारीरिक ताकद व मानसिक दृढतेचे महत्व राजपूत यांनी विविध दाखले देत अधोरेखित केले.
यावेळी प्रभारी प्राचार्या डॉ क्षितीजा गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे स्वागत पर मनोगत कार्यशाळेच्या संयोजिका प्रा मधुरा वाघ यांनी केले, तर निवेदन विद्यार्थिनी प्रिया शर्मा व वनिशा चेल्लानी यांनी केले.