Team My Pune City – सकाळचे साडेअकरा वाजलेले, विमानांची नियमित उड्डाणे सुरू असताना टर्मिनलवर अचानक सुरू होतो (Pune Airport) चित्रपटातील कथानकाप्रमाणे थरार, 11 वाजून 50 मिनिटांत संपूर्ण विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), बॉम्बशोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस), श्वान पथक, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरणातील सुरक्षा अधिकारी, राज्य राखीव दलाचे पोलीस, स्थलांतर अधिकारी, विमान कंपन्यांचे पथक, अग्निशामक यंत्रणा आणि इतर सुरक्षा व्यवस्थेतील 258 जवानांनी विमानतळाला छावणीचे रूप देतात.
Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची जागतिक वारसा युनेस्को स्थळांमध्ये नोंद झाल्याबद्दल भव्य रॅली
अखेर बॉम्ब नाशक पथकातील जवान सुरक्षात्मक कवच घालून सुसज्जतेने बॉम्ब ठेवलेल्या दिशेने जातात. त्यांनी दहा मिनिटांनंतर बॉम्ब निकामी झाल्याचे हात वर करून सांगताच सर्वाजण आनंद साजरा करतात. प्रवाशांना हा सारा प्रकार सुरक्षा व्यवस्थेनिमित्त झालेला एक सराव असल्याचे समजल्यानंतर ते सुटकेचा निःश्वास सोडतात.
ही सारी घटना होती विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेसाठी (Pune Airport) आणि त्यासाठी दहशतवादविरोधी आकस्मिक योजनेअंतर्गत सराव सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
अखेर बॉम्ब नाशक पथकातील जवान सुरक्षात्मक कवच घालून (Pune Airport) सुसज्जतेने बॉम्ब ठेवलेल्या दिशेने जातात. त्यांनी दहा मिनिटांनंतर बॉम्ब निकामी झाल्याचे हात वर करून सांगताच सर्वाजण आनंद साजरा करतात. प्रवाशांना हा सारा प्रकार सुरक्षा व्यवस्थेनिमित्त झालेला एक सराव असल्याचे समजल्यानंतर ते सुटकेचा निःश्वास सोडतात.
Ideal Mother Award : ज्ञानदायिनी शैक्षणिक संस्थेद्वारे “आदर्श माता पुरस्कार 2025” चे वितरण
ही सारी घटना होती विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेसाठी आणि त्यासाठी दहशतवादविरोधी आकस्मिक योजनेअंतर्गत सराव सत्राचे आयोजन करण्यात (Pune Airport) आले होते.
विमानतळाच्या टर्मिनलसह आजूबाजूच्या परिसरात ही सराव प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. तत्पूर्वी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी, हवाई दलातील सुरक्षा अधिकारी आणि विमानतळाचे संचालक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सराव प्रक्रिया पार पाडल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत आढळून आलेल्या त्रुटींचा, व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अंतर्भाव करून सुरक्षा मानक कार्यप्रणालीत (एसओपी) अंतर्भाव करण्यात आला, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात (Pune Airport) आली.