Team Pune City –जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथा पूजनाने (Alandi)आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव आणि गोकुळाष्टमी उत्सवाचा उत्साहात प्रारंभ झाला. वीणा मंडपात आज दिनांक १० ऑगस्ट ते १६ ऑगस्टपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे.
गाथा पूजनाचा मान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह.भ.प. चैतन्य महाराज कबीरबुवा यांना लाभला. त्यांच्या हस्ते गाथा पूजन संपन्न झाले.
या मंगलप्रसंगी आरफळकर महाराज, बाळासाहेब चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे पाटील, राहुल चिताळकर पाटील, मंगेश आरू, राजाभाऊ चौधरी, यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.
Pune: पुणे ते कोकण रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी कोकण विकास महासंघाचा मागणीपत्र सादर
Vadgaon Maval:कृष्णराव भेगडे यांचे कार्य मावळच्या इतिहासातील सुवर्णपान
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव व श्री कृष्ण जन्मोत्सवा निमित्त दि. १० ते दि. १६ पर्यंत प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१० रोजी दु.४ ते सायं ५ ह भ प चैतन्य महाराज कबीर यांचे प्रवचन संपन्न झाले.सायं.६ :३० ते ८:३० ह भ प शंकर महाराज बडवे यांचे कीर्तन संपन्न होत आहे.
दि.११ रोजी दु.४ ते सायं ५ ह भ प डॉ. नारायण महाराज जाधव यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.
दि.१२ रोजी दु.४ ते सायं ५ ह भ प गोविंद महाराज गोरे यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० ह भ प पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.
दि. १३ रोजी दु.४ ते सायं ५ ह भ प रमेश आप्पा महाराज यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था ह भ प बाळासाहेब यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.
दि.१४ रोजी दु.४ ते सायं ५ साधक आश्रम यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० ह भ प चिन्मय महाराज सातारकर यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.
दि. १५ रोजी दु.४ ते सायं ५ योगी निरंजनाथ यांचे प्रवचन, सायं.६ :३० ते ८:३० ह भ प समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन संपन्न होणार आहे.
दि.१६ रोजी ९ ते ११ ह भ प बापूसाहेब मोरे देहूकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे.