Team My pune city – रावेत येथील रेल्वे महामार्गाजवळील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘इको जॉगिंग ट्रॅक’(Eco Jogging Track) ( Eco jogging track)ची दुरावस्था चिंतेची बाब ठरली आहे. जॉगिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणची खराब स्थितीमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
MLA Amit Gorkhe : पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा सुरु होणार आयुर्वेद आणि होमिओपॅथी ओपीडी
मावळ लोकसभा युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस(Rajendra Taras) यांनी महापालिका उद्यान विभागाकडे तातडीने या ट्रॅकची स्वच्छता आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट सिटी अंतर्गत बांधलेल्या टॉयलेटच्या शेजारी असलेला हा इको जॉगिंग ट्रॅक अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे.
Rashi Bhavishya 9 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
“झाडांची निगा महापालिकेकडून व्यवस्थित होत नाही. नव्याने ( Eco jogging track) लागवड केलेल्या झाडांभोवती जंगली गवत वाढले असून त्यामुळे झाडांची योग्य वाढ होत नाही. तसेच या भागात कोणताही सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्यामुळे अनेक गैरप्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे,” असे ते म्हणाले.
राजेंद्र तरस यांनी महापालिका उद्यान विभागाकडे निवेदन देऊन येथे नियमित साफसफाई, मशागत तसेच सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित आणि आनंददायक व्यायामासाठी पर्यावरण मिळू शकेल. महापालिकेने याबाबत त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली ( Eco jogging track) जात आहे.