situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Devendra Fadnavis: पुण्यात पाच नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी; एक हजार पोलीस कर्मचारी वाढणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Updated On:
Devendra Fadnavis

Team My Pune City – पुणे शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार, (Devendra Fadnavis)वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा बदलता स्वरूप लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुण्यात आणखी पाच नवीन पोलीस ठाण्यांना लवकरच मंजुरी देण्यात येणार असून, यासाठी अतिरिक्त एक हजार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात शुक्रवारी पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन (Devendra Fadnavis)मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अप्पर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अर्चना त्यागी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “पुण्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे पोलिस दलातही आधुनिकता आणि कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. यापूर्वी सात नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली होती आणि ती आता कार्यरत आहेत. एकाच वेळी सात पोलीस ठाणी मंजूर होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ होती. आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लोहगाव, नन्हे, लक्ष्मीनगर (येरवडा), मांजरी (हडपसर) आणि येवलेवाडी (कोंढवा) या भागांमध्ये पाच नव्या पोलीस ठाण्यांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर केला जाईल.”


Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप

Madhav Patil: विधानसभा उपाध्यक्षांचा अवमान केल्याबद्दल पालिका आयुक्तांनी माफी मागावी आणि त्यांचे निलंबन करावे — माधव पाटील

या सोबतच शहरात दोन नवीन पोलीस उपायुक्त (DCP) नियुक्त करण्याची मागणी देखील करण्यात आली असून, पोलीस दलाचा नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. हा आकृतिबंध तब्बल 60 वर्षांनंतर अद्ययावत करण्यात आला असून, भविष्यातील सुरक्षेच्या गरजा ध्यानात घेऊन तयार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पुण्यातील अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीचेही कौतुक केले. “दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा आता आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असा नवीन टप्पा सुरू करण्यात आला आहे. एआय सक्षम कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणासह गुन्हे प्रतिबंधन व तपास अधिक प्रभावी होणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.

पुणे ही ‘फ्युचर सिटी’ असून, माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत आघाडी घेतलेल्या या शहराच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर पुढील दहा वर्षांत भर दिला जाणार आहे. यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यासारख्या यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

Follow Us On