Team My pune city – गीताधर्म मंडळातर्फे गीताधर्म मंडळाचे संस्थापक ( Pune News) पत्रकारमहर्षी ग. वि. केतकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने वंदेमातरम्चे अभ्यासक मिलिंद प्रभाकर सबनीस यांचा गौरव केला जाणार आहे.
Alandi : पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज- माधव खांडेकर
पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता गीतधर्म मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सबनीस १९९४ पासून वंदेमातरम् या विषयाचे अभ्यासक असून गेल्या ३० वर्षांपासून या विषयावर सखोल संशोधन करीत ( Pune News) आहेत.
Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप
या एकाच गीताच्या त्यांनी केलेल्या दोनशे पंचवीसहून अधिक ध्वनिमुद्रणांच्या संग्रहाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये २००२ मध्ये नोंद करण्यात आली आहे. ‘समग्र वन्दे मातरम्’ या द्विखंडीय कोशाचे लेखनही त्यांनी केले आहे. याशिवाय राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजमुद्रा या राष्ट्रीय प्रतिकांवरील स्वतंत्र पुस्तके प्रकाशित आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त मिलिंद सबनीस यांचे वंदेमातरम् या विषयावर व्याख्यान होणार ( Pune News) आहे.