पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चालवण्यात येणाऱ्या (Pimpri Chinchwad)नेहरूनगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारातील लहान मृत प्राण्यांची शवदाहिनी (इन्टर्नेट) येथे विद्युत विभागाच्या वतीने देखभाल व दुरुस्ती विषयक कामकाजासाठी पुढील तीन दिवस (९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट) बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
तांत्रिक दृष्टिकोनातून विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने शववाहिनीची ही कामे महत्त्वाची असतात. प्राण्यांच्या शववाहिनीच्या दरवाजाच्या दुरुस्तीसाठी पुढील काही दिवस दुरुस्तीविषयक कामकाजासाठी बंद राहणार आहे. ११ ऑगस्ट पर्यंत विद्युत विषयक कामे पूर्ण होताच शववाहिनी पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार आहे.
Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप
Madhav Patil: विधानसभा उपाध्यक्षांचा अवमान केल्याबद्दल पालिका आयुक्तांनी माफी मागावी आणि त्यांचे निलंबन करावे — माधव पाटील
तो पर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पशु वैद्यकीय विभागाच्या विद्युत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.