Team My pune city –आज दिनांक ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता द मून हाऊस इंटरनॅशनल स्कुल (Charholi)येथे (नरसिंग कोयले यांच्या मालकीचे) यांच्या घरामध्ये अचानक आग लागली.त्याची माहिती मच्छिंद्र शेंडे (पोलीस अधिकारी, आळंदी पोलीस स्टेशन) यांनी अग्निशमन दलास दिली.
तत्काळ आळंदी नगरपरिषद अग्निशमन विभागाचे वाहन व पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे आग ही दुसऱ्या मजल्यावरील किचनमध्ये असल्याचे निदर्शनास आले. जवळील इमारतीच्या टेरेसवरून खिडकीच्या काचा फोडून आग विझविण्याचे काम सुरु करण्यात आले.
सुरुवातीला LPG गॅस सिलेंडरचा स्फोट होऊ नये म्हणून त्यावर पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचे काम करण्यात आले. जवानांनी प्रचंड धाडस व तत्परता दाखवत दोन गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढले.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लिडिंग फायरमन: प्रसाद बोराटे,फायरमन: अमित घुंडरे, सिध्दार्थ गावडे, साहिल काळे,वाहनचालक: अजित कुऱ्हाडे, विनायक सोळंकी,विद्युत कर्मचारी: दिगंबर कुऱ्हाडे, आरोग्य कर्मचारी: सोमनाथ कांबळे यांनी समन्वयाने व धाडसाने आग नियंत्रणात आणली.
या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही, परंतु घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप
Madhav Patil: विधानसभा उपाध्यक्षांचा अवमान केल्याबद्दल पालिका आयुक्तांनी माफी मागावी आणि त्यांचे निलंबन करावे — माधव पाटील
घटनास्थळी आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच चऱ्होली अग्निशमन केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते व त्यांनीही आग विझविण्याच्या कार्यात सहकार्य केले.
आज अग्निशमन दल कर्मचारी प्रसाद बोराटे यांची चुलती यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.अत्यंविधी सुरू असताना त्यावेळी संबधीत घटनेची माहिती कळताच कर्तव्याला प्राधान्य देत आग लागलेल्या घटनास्थळी जात त्यांनी आपले कर्तव्य बजावले.
आज अरुंद रस्ता असल्याने अग्निशमन दल गाडी अडकलीघटनास्थळी अरुंद रस्ता असल्याने त्या अडचणींचा सामना करत गाडी पोहचली.

तेथील आग पूर्णपणे नियंत्रणात आणल्या नंतर तेथून आळंदी कडे निघताना अग्निशमन दलाची गाडी अरुंद रस्त्या मुळे अडकली.एक दीड तासाच्या प्रयत्ना नंतर ती समस्या सुटली. कमीत कमी अग्निशमन दल गाडीला पोहचण्यासाठी कोणतीही अडचण होऊ नये.अश्या रुंदीचे रस्ते त्या परिसरात आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.