situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

SPM School : शिक्षण प्रसारक मंडळी शाळेत रक्षाबंधन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा

Published On:
SPM School

Team My pune city – आज शुक्रवार ( दि.८ ) रोजी शिक्षण प्रसारक मंडळीच्या मराठी माध्यम निगडी ( SPM School )शाळेत सामाजिक संवेदना जपण्याच्या हेतूने शाळेमध्ये सामाजिक रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या छोडो भारत चळवळीची स्मृती म्हणून ९ ऑगस्ट क्रांती दिन देखील साजरा करण्यात आला. तसेच अभिजात भाषा म्हणून स्थान असणाऱ्या संस्कृत भाषेचा गौरव म्हणून संस्कृत दिन देखील साजरा करण्यात आला.

Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार – अजित पवार

या कार्यक्रमासाठी जनजाती वनवासी कल्याण आश्रम येथून मा. श्री. ऋषभ मुथा (प्रांत छात्रावास प्रमुख) , यशवंत भोंग (पिंपरी चिंचवड सचिव), सुवर्णा काळे (सामाजिक कार्यकर्त्या) प्रसाद देव (सहखजिनदार) व आदित्य जोशी हे मान्यवर तसेच शाळेचे ( SPM School ) पालक चिटणीस व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व भारतमाता पूजनाने करण्यात आली. संस्कृत दिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेतून गाणी, गोष्टी, नाटिका इत्यादींचे सादरीकरण केले.
रक्षाबंधनचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांकडून दैनंदिन उपयोगी वस्तू मागविण्यात आल्या.

विद्यार्थ्यांकडून गोळा करण्यात आलेल्या उपयुक्त वस्तू जनजाती वनवासी कल्याण आश्रम व अपंग विद्यालय यामुनानगर येथील गरजू मुलांना शाळेकडून देण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थ्यांकडून अपंग विद्यालय निगडी येथील मुलांना राख्या बांधण्यात ( SPM School )आल्या.

Rotary Club of Maval : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’चे मोफत वाटप


शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगून सर्वांनी संस्कृत भाषेचे अध्ययन केले पाहिजे असे आपल्या मनोगतातून सांगितले.क्रांती दिनाची माहिती नववीतील विद्यार्थिनी सरोजिनी विधाते हिने सांगितली. संस्कृत दिनाची तयारी शाळेतील संस्कृत शिक्षिका डॉ. सौ. मुक्ता दाभोळकर यांनी विद्यार्थ्यांकडून करून ( SPM School ) घेतली.


सामाजिक रक्षाबंधन चे गीत संगीत शिक्षिका रमा जोशी यांनी गायले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रथमेश ढोले व शिक्षिका सौ.अर्चना येळे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता संस्कृत भाषेत पसायदान म्हणून करण्यात आले.


शाळा समिती अध्यक्ष मा.ॲड दामोदरजी भंडारी यांच्या प्रेरणेतून शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व शिक्षक, पालक , विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या टीमवर्क मुळे हा उपक्रम यशस्वी ( SPM School ) झाला.

Follow Us On