Team My pune city –आज ( दि. ०७ जुलै रोजी) श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आळंदी देवाची( Alandi) सू येथे वाढत्या दळण – वळणामुळे निर्माण झालेले धोके लक्षात घेता आळंदी – दिघी पोलीस स्टेशन यांच्या वतीने “वाहतूक जागृती अभियान” अंतर्गत एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
MLA Shankar Jagtap : प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे देखरेख व पाठपुरावा करावे – आमदार शंकर जगताप
कार्यक्रमाचे प्रमुख व मार्गदर्शक म्हणून नांदुरकर (पी.आय. आळंदी – दिघी पोलीस स्टेशन) यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, शिस्त व सुरक्षिततेचे महत्व ( Alandi) सूयावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पोस्को कायदा, ऑनलाइन खरेदी विक्री धोके – फायदे, हेल्मेट वापरणे किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. संकटकाळी वा आपत्कालीन वेळी पोलीस मदतीसाठी 112 नंबर विषयी माहिती सांगितली.

Fraud : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कायद्याविषयीचे संभ्रम वा गैरसमज दूर करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, ट्राफिक पोलीस सीमा अंगारे, दादासाहेब नाळे, राजाभाऊ पानगावकर, इम्रान शेख आदी उपस्थित ( Alandi) सूहोते.
कार्यक्रमाचे औचित्य साधत पोलीस प्रशासना तर्फे ग्रंथालयास शंभर पुस्तके भेट रूपाने देण्यात आली. या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे ( Alandi) सूत्रसंचालन सूर्यकांत खुडे यांनी केले.