Team My Pune City – राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 वरील हडपसर ते दिवेघाट ( Diveghat) या टप्प्याचे रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामांमध्ये खडकफोडी (ब्लास्टींग) आवश्यक असल्याने वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लादण्यात आले आहेत. हे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), प्रकल्प पॅकेज-6 अंतर्गत करण्यात येत आहे.
Fraud : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री
या अनुषंगाने, दिवेघाटात खडक ब्लास्टींगच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत घाटातून जाणारी वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित दिवशी या मार्गावर प्रवास ( Diveghat) टाळावा, किंवा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी केले आहे.
वाहनधारकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा :( Diveghat)
कात्रज-बोपदेव घाट (राज्य मार्ग क्र. 131) मार्गे सासवड
खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड
कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. 119) मार्गे सासवड
हडपसर-उरळी कांचन-शिंदवणे घाट (राज्य मार्ग क्र. 61) मार्गे सासवड
PMC : महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा
पुणे जिल्ह्यातून सासवडकडे नियमित प्रवास करणाऱ्या( Diveghat) वाहनधारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी ही माहिती लक्षात घेऊन प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासन आणि NHAI तर्फे करण्यात आले आहे.
खडक ब्लास्टींगचे काम पोलीस यंत्रणांच्या देखरेखीखाली सुरक्षित पद्धतीने पार पाडले जाणार असून, या कामामुळे पालखी मार्गाचे रुंदीकरण वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले ( Diveghat) आहे.