Team My Pune City – रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर ( Rakshabandhan) पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ) कडून महिला प्रवाशांसाठी एक अभिनव आणि आकर्षक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लकी-ड्रॉ’ योजनेच्या माध्यमातून महिलांना शनिवारी (दि.9) ‘ पैठणी साडी आणि मोफत बस पास जिंकण्याची संधी मिळणार आहे.
Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा
या उपक्रमाची संकल्पना पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक पंकज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. ( Rakshabandhan) सध्या पीएमपीएमएलद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवड, उपनगरे आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात दररोज सुमारे 11 ते 12 लाख प्रवाशांची वाहतूक होते. यापैकी सुमारे 4 ते 4.5 लाख महिला प्रवासी दररोज या सेवेचा लाभ घेतात.
Shero-shayari : मनाला आवडलेले शेर – कुछ इस तरहसे मैने जिंदगी को आंसा कर दिया…
या ‘लकी-ड्रॉ’ योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांनी त्या दिवशी (शनिवारी) प्रिंटेड तिकीट, दैनंदिन पास, यूपीआय द्वारे किंवा मोबाईल अॅपवरून ( Rakshabandhan) घेतलेले तिकीट असणे आवश्यक आहे. एकूण 17 महिला विजेत्यांची निवड संगणकीकृत सोडतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. विजेत्यांना ‘कलाक्षेत्रम सिल्क अँड सारीज’ तर्फे आकर्षक पैठणी आणि पीएमपीएमएलकडून एक महिन्याचा मोफत बस पास देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी रेडिओ मिर्ची 98.3हे रेडिओ पार्टनर असून, त्यांच्यातर्फे योजनेचे व्यापक प्रमोशन केले जात आहे.
सहभागासाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
बसमध्ये लावण्यात आलेला QR कोड स्कॅन करून ऑनलाइन फॉर्म भरता येईल.( Rakshabandhan)
स्मार्टफोन नसलेल्या महिलांनी वाहकाकडून कूपन घेऊन त्यावर आवश्यक माहिती भरून ते बसमधील बॉक्समध्ये टाकावे.
एका तिकीटासाठी एका मोबाइल क्रमांकावरून एकदाच सहभाग घेता येईल.( Rakshabandhan)
फॉर्ममध्ये तिकीट क्रमांक व आधारकार्डवरील शेवटचे चार अंक नमूद करणे बंधनकारक आहे.
चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास, तसेच तिकीट सादर न केल्यास बक्षीस देण्यात येणार नाही.
महत्त्वाच्या अटी व नियम:
पीएमपीएमएलचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना या योजनेत सहभाग घेता येणार नाही.( Rakshabandhan)
लकी-ड्रॉ रद्द किंवा स्थगित करण्याचा तसेच अटींमध्ये बदल करण्याचा सर्वस्वी अधिकार पीएमपीएमएलकडे राहील.
विजेत्यांची नावे आणि सोडतीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
रक्षाबंधनाच्या आनंदात अधिक भर घालणाऱ्या या योजनेत पुण्यातील सर्व महिला प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले ( Rakshabandhan) आहे.