Team My pune city – शाळेत विद्यार्थिनींचे लैगिंक ( Molest Case) शोषण करणार्या शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली होती. या शिक्षकाला निलंबित करून त्याची खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
Kamshet Crime News : कामशेत येथे नागरिकांनीच पकडले चोराला
संतोष हरिभाऊ बेंद्रे असे या शिक्षकाचे नाव आहे. निगडी येथील महापालिकेच्या एका शाळेत शिकवत होता. अध्यापनाच्या नावाखाली तो वर्गातील विद्यार्थिनींच्या ( Molest Case) शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श करत असल्याचे समोर आले होते. नंतर तो एका नव्हे, तर इतर विद्यार्थिनींसोबतही अशाच प्रकारचे अश्लिल वर्तन करत होता. पालकांच्या तक्रारीनंतर बेंद्रे याच्याविरुध्द निगडी पोलिस ठाण्यात पोक्सो आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला 23 जुलैला अटक झाली.
निगडीचे पोलिस निरीक्षकांनी महापालिकेला बेंद्रे याला अटक केल्याबाबत कळविले. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने या शिक्षकावर कारवाई केली आहे. त्याचे महापालिका सेवेतून निलंबन करून खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी ( Molest Case) दिले आहेत.