Team My Pune City – महाराष्ट्र परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे ( HSRP Number Plate) बंधनकारक केले आहे. यासाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे, परंतु यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
यापूर्वी मार्च 2025 , एप्रिल 2025 आणि जून 2025 अशा तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु आता परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. 15 ऑगस्टनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट दंडात्मक कारवाई होईल, ज्यामध्ये 1000 ते 10 हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
म्हणून दिली होती मुदतवाढ( HSRP Number Plate)
HSRP बसवण्याच्या प्रक्रियेला अनेक अडचणींमुळे गती मिळाली नाही. महाराष्ट्रात 2.1 कोटी वाहनांना HSRP आवश्यक आहे, परंतु आतापर्यंत केवळ 23 लाख वाहनांवरच प्लेट्स बसवल्या गेल्या आहेत.
ऑनलाइन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, फिटमेंट सेंटरवरील गर्दी, मर्यादित प्लेट्सची उपलब्धता आणि ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली. नागपूरसारख्या शहरांमध्ये बुकिंग स्लॉट्स सप्टेंबर 2025 पर्यंत भरलेले आहेत, ज्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत आहेत.
HSRP कोणाला बंधनकारक?
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना (दुचाकी, तिनचाकी, चारचाकी, व्यावसायिक आणि खासगी) HSRP बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. यामध्ये क्रोमियम-आधारित होलोग्राम, लेसर-एच्ड युनिक आयडी आणि नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक असलेल्या टॅम्पर-प्रूफ प्लेट्सचा समावेश आहे. नवीन वाहनांना (एप्रिल 2019 नंतर) ही प्लेट्स आधीच बसवलेल्या असतात.
Sunil Shelke : लोणावळा नगरपरिषदेच्या गलथान कारभारावर आमदार सुनील शेळके यांचा थेट हल्लाबोल!
अशी करा नोंदणी
वाहनधारकांनी खालील पायऱ्या फॉलो कराव्याः ( HSRP Number Plate)
ऑनलाइन अर्ज: www.transport.maharashtra.gov.in किंवा www.bookmyhsrp.com वर जा. RTO निवडाः तुमच्या वाहनाच्या नोंदणीच्या आधारावर योग्य RTO कोड निवडा.
वाहन तपशील भराः नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक ( HSRP Number Plate)आणि मोबाइल नंबर टाका.
अपॉइंटमेंट बुक कराः जवळच्या अधिकृत फिटमेंट सेंटरवर तारीख आणि वेळ निवडा.
पेमेंटः दुचाकीसाठी 531, तिनचाकीसाठी 500 आणि चारचाकीसाठी 745 (GST सह) फी आकारली जाते. होम डिलिव्हरीसाठी अतिरिक्त 125 (दुचाकी) आणि 250 (चारचाकी) ( HSRP Number Plate) लागतात.
फिटमेंट: अपॉइंटमेंटच्या दिवशी फिटमेंट सेंटरवर वाहन आणि कागदपत्रे (RC, ओळखपत्र) घेऊन जा.
15 ऑगस्टनंतर काय?
15 ऑगस्ट 2025 नंतर HSRP नसलेल्या वाहनांवर मोटर वाहन कायद्याच्या कलम 177 अंतर्गत 1 हजार ते 10 हजार दंड आकारला जाईल. तथापि, ज्यांनी 15 ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली आहे, परंतु फिटमेंट नंतरच्या तारखेला आहे, त्यांना दंड लागणार ( HSRP Number Plate) नाही.