situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Metro : पीएमपीएमएल पेक्षा मेट्रो बरी, बस तिकीट दरवाढीमुळे मेट्रो मालामाल; प्रवाशांची संख्या 8 लाखांनी वाढली

Published On:
pune metro

Team My Pune City – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील ( Pune Metro) सार्वजनिक वाहतुकीचा चेहरा बदलतो आहे. पीएमपीएमएलच्या तिकीट दरात झालेल्या वाढीमुळे अनेक नागरिकांनी आता मेट्रोचा मार्ग निवडला असून, याचा थेट फायदा पुणे मेट्रोला झाला आहे. जुलै महिन्यात तब्बल 7 .98 लाख नव्या प्रवाशांची भर मेट्रोमध्ये पडली आहे, अशी अधिकृत माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

Firing : पुण्यात किरकोळ वादातून गोळीबार, तिघे ताब्यात

पिंपरी ते शिवाजीनगर, डेक्कन, गरवारे कॉलेज व स्वारगेट या दैनंदिन रूटवरील प्रवासी विशेषतः मेट्रोकडे वळत आहेत. याआधी या मार्गांवर पीएमपीएमएलचा मोठा प्रभाव होता. मात्र, दरवाढ, अनियमित वेळापत्रक आणि बस सेवेतील अस्थिरता यामुळे नागरिक मेट्रोला अधिक पसंती देत आहेत.

जूनमध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या 24.47 लाख होती, जी जुलैमध्ये 32.45 लाखांवर पोहोचली. विशेषतः पिंपरी ते फुगेवाडी, फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट ( Pune Metro)आणि शिवाजीनगर ते गरवारे कॉलेज या मार्गांवर प्रवाशांची लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ फक्त आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर शहरातील प्रवासाच्या सवयींमध्ये झालेला बदल अधोरेखित करते.

Rashi Bhavishya 5 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

काही प्रवाशांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मेट्रोचा प्रवास वेळबचत करणारा, आरामदायक आणि तुलनेत स्वस्त आहे. शिवाय, गर्दी नियंत्रण, वेळेचं ( Pune Metro)अचूक पालन आणि स्वच्छता या बाबतीत मेट्रो अधिक विश्वासार्ह आहे.” त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्व थरातील नागरिकांनी मेट्रोला पर्याय म्हणून स्वीकारले आहे.

मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांनी सांगितले की, “प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचं आणि सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्याचं नियोजन सुरू आहे.” शहरात सार्वजनिक वाहतूक सुलभ करण्यासाठी हा बदल सकारात्मक दिशेने जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

पीएमपी प्रशासनासमोरील आव्हाने अधिक वाढली असून, नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी त्यांनाही सेवा दर्जा आणि वेळेच्या अचूकतेवर भर द्यावा लागणार ( Pune Metro) आहे.

Follow Us On