Team My Pune City – पुण्यात सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी ( Firing ) परिसरात गाडीला गाडी घासल्याच्या कारणातून झालेल्या वादात एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना सोमवारी (दि.5) सायंकाळी घडली. भर रस्त्यात गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात तसेच गावात प्रचंड दहशत पसरली.
Mallikarjuna Jyotirlinga: कथा दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची मल्लिकार्जुन महादेवाची
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे ( Firing ) काम सुरू होते. पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबार करणारे तरुण हे खडकवासला परिसरातील आहेत.
Mallikarjuna Jyotirlinga: कथा दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची मल्लिकार्जुन महादेवाची
काही तरुण रस्त्याच्या कडेला त्यांची कार घेऊन थांबले होते . तेव्हा मागून आलेल्या कारचालक तरुणांची कार त्यांच्या कारला घासली. त्यावरून या तरुणांमध्ये वादविवाद ( Firing ) झाला. नंतर कारमधील दोन तरुणांनी चांगलाच गोंधळ झाला. तेव्हा एकाने स्वतःकडील पिस्तूल काढत हवेत गोळीबार केला.
नंतर तरुण कार घेऊन पसार झाले. दरम्यान, हवेत गोळीबार झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही तसेच स्थानिक नागरिकांच्या माहितीवरून तिघा संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपास नांदेड सिटी पोलिस करीत ( Firing ) आहेत.