Team My Pune City –श्रावण महादेवाची भक्ती करण्याचा (Mallikarjuna Jyotirlinga)पवित्र महिना तसे तर आपण १२ हि महिने देवाची भक्ती करतो पण या महिन्यास विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. अशा या श्रावणात आपण १२ ज्योतिर्लिंगाची माहिती पाहणार आहोत.मल्लिकार्जुन हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी दुसरे ज्योतिर्लिंग आहे. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी श्रीशैल पर्वत आहे. त्या पर्वतावर मल्लिकार्जुन महादेवाचे मंदिर आहे. मल्लिकार्जुन मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणूनही ओळखले जाते. श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रमुख देवता माता पार्वती (मलिका) आणि भगवान शिव (अर्जुन) आहेत.
कसे निर्माण झाले हे जोतिर्लिंग
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा शिव-पार्वती, श्रीगणेश आणि कार्तिकेय स्वामी यांच्याशी संबंधित आहे. एकदा शिवशक्ती कैलास पर्वतावर बसले होते. सर्वत्र आनंदी वातावरण होते. त्या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीच्या मनात विचार आला की , श्रीगणेश आणि कार्तिकेय स्वामी विवाह योग्य झाल्यामुळे आता या दोन मुलांचे लग्न करावे.
Somnath Mahadev: कथा पहिल्या ज्योतिर्लिंगाची,सोमनाथ महादेवाची
भगवान शिव आणि माता पार्वतीने लगेच कार्तिकेय स्वामी आणि श्रीगणेशाला बोलावले. आणि सांगितले आम्ही तुमच्या विवंच विचार करत आहोत. भगवान शिवने दोन्ही पुत्रांना सांगितले की, तुमच्यापैकी जो या पृथ्वीची प्रदक्षिणा प्रदक्षिणा घालून प्रथम परत येईल, आम्ही त्याचे प्रथम लग्न करू.
भगवान शिवची अट ऐकताच कार्तिकेय स्वामी ताबडतोब त्यांच्या वाहन मोरावर बसून उडून गेले. गणेशजी बुद्धीने हुशार असल्याने श्रीगणेश आपल्या वाहन उंदरावर बसले आणि काही विचार करून त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांची प्रदक्षिणा केली. त्यांनी आपल्या आई-वडिलांची प्रदक्षिणा घातली. श्रीगणेशाने शिव-पार्वतीला सांगितले की तुम्ही दोघे माझ्यासाठी संपूर्ण जग आहात.
श्रीगणेशाच्या या शब्दांनी शिव आणि पार्वती खूप आनंदित झाले. त्यांनी श्रीगणेशाचे लग्न लावून दिले. काही वेळाने कार्तिकेय स्वामी जग प्रदक्षिणा करून परतले. श्रीगणेशाचे लग्न झाल्याचे त्यांनी पाहिले.
जेव्हा कार्तिकेय स्वामींना संपूर्ण गोष्ट कळली तेव्हा ते संतप्त झाले. त्यांना असे वाटले की त्यांच्या आई-वडिलांनी म्हणजे शिव-पार्वतीने आपल्यासोबत योग्य केले नाही. त्यामुळे संतप्त होऊन कार्तिकेय स्वामी कैलास पर्वत सोडून क्रंच डोंगरावर गेले. हा क्रंच डोंगर दक्षिण भारतातील कृष्णा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर आहे, त्याला श्रीशैल आणि श्रीपर्वत असेही म्हणतात.
कार्तिकेयाला समजावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले,कार्तिकेय कैलासात परतले नाहीत, तेव्हा माता पार्वती आणि महादेवांनी ठरवले की आपण कार्तिकेयाला भेटायला जायचं. शिव पार्वती तिथे येणार हे काळातच कार्तिक स्वामी तिथून निघून गेले. शेवटी कार्तिकेयला पाहण्याच्या आकांक्षेने भगवान शंकर आणि देवी पार्वती ज्योतीचे रूप धारण करून येथे विराजमान झाले. तेव्हापासून हे शिवधाम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या नावाने प्रसिद्ध झाले. कथेनुसार, प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला भगवान शिव देवी पार्वती येथे येतात, असे म्हटले जाते.
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव.तिथे शिवाची आराधना करणार्या भक्ताला अश्वमेध यज्ञात जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य या मंदिरातही मिळते, अशी भक्तांची धारणा आहे.