Team My pune city –पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये (Pune)वाढत्या अनधिकृत झाडतोडीमुळे शहराचा श्वास हिरावला जात आहे. एकामागून एक पडणारी झाडे ही केवळ हिरवाईची हानी नसून भविष्यातील प्रदूषण, कोरडी हवा आणि उष्णतेचा गंभीर इशारा आहे.
शहराच्या या पर्यावरणीय हानीविरोधात आवाज उठवत आम आदमी पार्टी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तर्फे झाडांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
या आंदोलनातून निसर्गरक्षणासाठी लोकांचा जिव्हाळ्याचा हक्काचा आवाज उमटला. शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून झाडतोडीविरोधातील निषेध नोंदवला.
Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे MIDC परिसरातील जोडरस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक; उद्या नवलाख उंब्रेच्या भैरवनाथ मंदिरात सभा
PCMC: पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवारा केंद्र निराधारांसाठी ठरतंय आधार
आम आदमी पार्टी कडून हे स्पष्ट करण्यात आले की, शहरातील हिरवाई वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा हा जनआक्रोश आणखी तीव्र केला जाईल.