Team My pune city – राज्यसभा खासदार आणि (Shibu Soren) झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (गुरुजी) यांचे आज (4 ऑगस्ट) निधन झाले. त्यांनी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना किडनीशी संबंधित व प्रकृतीच्या आणखी काही समस्या होत्या. ते 81 वर्षांचे होते.
Atharvashirsha : नृत्य-गायनातून साकारले अथर्वशीर्ष
दिशाम गुरु शिबू सोरेन यांचा जन्म 11 जानेवारी 1944 रोजी सध्याच्या रामगड जिल्ह्यातील गोल ब्लॉकमधील नेमरा येथे झाला. गावातील शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या दिशाम गुरु यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले आहे. ते फक्त 13 वर्षांचे होते तेव्हा(Shibu Soren) त्यांच्या वडिलांची सावकारांनी हत्या केली. त्यानंतर शिबू सोरेन यांनी त्यांचे शिक्षण सोडून सावकारांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला.
Ganesh Maharaj Mohite : संगीत विशारद गणेश महाराज मोहिते यांचा शिष्यांकडून सत्कार
शिबू सोरेन हे झारखंड राज्य बनवण्यात आघाडीवर होते. त्यांचे प्रशंसक त्यांना गुरुजी म्हणून बोलवायचे. तीनवेळा ते झारखंडचे मुख्यमंत्री बनले. एकदाही ते आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. बिहारापासून वेगळ्या झालेल्या झारखंडचे ते 2005 साली तिसरे मुख्यमंत्री बनले. 2005 साली आपल्या पहिल्या कार्यकाळादरम्यान ते फक्त 10 दिवस, 2008 साली दुसऱ्या कार्यकाळात एक वर्ष आणि तिसऱ्या कार्यकाळात काही महिने मुख्यमंत्री (Shibu Soren) राहिले.