Team My Pune City – छत्रपती संभाजीनगर येथून सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात आलेल्या एका तरुणीच्या प्रकरणात, पुण्यातील कोथरूडमध्ये ( Pune Crime News ) राहणाऱ्या तीन तरुणींना पोलिसांकडून नाहक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणीला मदत म्हणून तिच्या फ्लॅटमध्ये एक दिवसासाठी आसरा दिल्यानंतर या तिघी तरुणींना पोलिसांकडून संशयिताप्रमाणे वागणूक मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये 1994-95 च्या बॅचचा रंगला विद्यार्थी मेळावा
सदर तरुणी पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी कोथरूड पोलिसांच्या मदतीने या तिघींच्या फ्लॅटवर धाड टाकली. ( Pune Crime News ) त्यानंतर त्यांना जबाब नोंदविण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत त्यांच्या बाबतीत जातिवाचक शब्दांचा वापर करत अयोग्य वागणूक दिल्याचा आरोप या तरुणींनी केला आहे. “आमची कोणतीही चूक नसताना, आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तासन्तास बसवले. आमच्यावर संशय घेऊन मानसिक त्रास देण्यात आला,” अशी व्यथा पीडित तरुणींनी मांडली.
या प्रकरणी न्याय मिळावा आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी तिन्ही तरुणींनी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन तरुणींची भेट घेतली व त्यांच्या तक्रारींचे गांभीर्य ओळखले.
Ganesh Maharaj Mohite : संगीत विशारद गणेश महाराज मोहिते यांचा शिष्यांकडून सत्कार
या वेळी आमदार रोहित पवार ( Pune Crime News ) म्हणाले, “कोथरूडमधील या तिघी तरुणींची कुठलीही चूक नसताना त्यांच्यावर पोलिसांनी अन्याय केला. घरात घुसून अरेरावी केली आणि जातीवाचक शब्द वापरले. ही गोष्ट अत्यंत निंदनीय असून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे.”
या घटनेनंतर पुणे पोलिस आयुक्तांनी या तरुणींच्या मागण्यांची दखल घ्यावी आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. पोलिस यंत्रणेकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली असून, न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या तरुणींच्या आंदोलनाकडे नागरिकांचेही लक्ष वेधले गेले ( Pune Crime News ) आहे.