Team My Pune City – संयुक्त महाराष्ट्र चळवळीत (Annabhau Sathe) अग्रणी भूमिका बजावणारे, वंचितांचे आणि कामगारांचे सशक्त प्रतिनिधित्व करणारे, साहित्य आणि लोककलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. यासंदर्भातील एक सविस्तर निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले आहे.
PMPML : पीएमपीच्या ताफ्यात लवकरच ‘हायड्रोजन बस’; प्रदूषणमुक्त प्रवासाच्या दिशेने एक पाऊल
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, स्वर्गीय अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी सध्या साजरी केली जात आहे. फक्त दीड दिवसाचे औपचारिक शिक्षण घेऊनही त्यांनी 35 कादंबऱ्या ( Annabhau Sathe) , 14 लोकनाट्ये, 13 कथासंग्रह, 10 पोवाडे, 7 चित्रपटांच्या पटकथा आणि एक प्रवासवर्णन लिहून मराठी साहित्यविश्वात अपूर्व कामगिरी बजावली आहे.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जगभर पोहोचवले, दलित, वंचित, शोषितांसाठी संघर्ष केला आणि लोकशिक्षणाच्या माध्यमातून ( Annabhau Sathe) समाजातील अंधश्रद्धा व चुकीच्या रूढी परंपरांविरोधात लढा दिला.
भापकर यांनी यामध्ये आणखी एक ऐतिहासिक प्रसंगाचा उल्लेख केला आहे. जेव्हा पंडित नेहरू रशियात पत्रकार परिषदेला गेले असताना त्यांना अण्णाभाऊ साठे व राज कपूर यांच्याबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी राज कपूर यांची माहिती पंडितजींना होती, पण अण्णाभाऊ साठे यांच्याबाबत त्यांनी तत्काळ तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडून (Annabhau Sathe) माहिती घेतली आणि त्यांचा सन्मान केला होता. एकदा तर नेहरूजी स्वतः अण्णाभाऊ साठेंच्या झोपडीत भेटण्यासाठी गेले होते, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भापकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा. ही केवळ माझीच नाही तर कोट्यवधी जनतेची भावना आहे. त्यामुळे विलंब न करता त्यांना भारतरत्न जाहीर करावे,अशी मागणी भापकर यांनी केली (Annabhau Sathe) आहे.