Team My Pune City – प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ( PMPML) आता ‘हायड्रोजन इंधन’ या नव्या पर्यायी साधनाचा प्रयोग करणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पीएमपीच्या ताफ्यात लवकरच दोन हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बस दाखल होणार असून, त्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आणि खाजगी कंपनी ‘ओलेक्ट्रा’ यांच्यासोबत संयुक्त चर्चा सुरू आहे.
Firing : जमिनीच्या वादातून भावावर गोळीबार
पुण्यातील वाढते वायूप्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, पर्यायी व स्वच्छ इंधनाचा वापर करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. हायड्रोजन हे इंधन प्रदूषणरहित असून, त्याच्या ज्वलनामुळे केवळ पाण्याची वाफ ( PMPML) बाहेर पडते. त्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडसारख्या हानिकारक वायूंचा उत्सर्जन होत नाही. परिणामी, हवामान सुधारण्यास मदत होईल आणि नागरिकांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास हातभार लागेल.
या हायड्रोजन बसचे कार्यप्रणाली तंत्रज्ञानही अत्याधुनिक आहे. बसमध्ये फ्युएल सेल बसविलेले असते. या सेलमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या अभिक्रियेतून वीज निर्माण होते आणि ही वीज बसची इलेक्ट्रिक मोटर चालविण्यासाठी वापरली( PMPML) जाते. त्यामुळे ही बस पारंपरिक डिझेल किंवा सीएनजी बसच्या तुलनेत अधिक स्वच्छ आणि कार्यक्षम ठरते.
या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे महासंचालक ओमप्रकाश बकोरिया म्हणाले, “पीएमपीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दोन हायड्रोजन बस धावणार आहेत. यासाठी आम्ही ‘एनसीएल’ची मदत घेणार असून, ‘ओलेक्ट्रा’ कंपनीसोबतही सविस्तर चर्चा सुरू आहे. यशस्वी चाचणीनंतर याचा विस्तार केला ( PMPML) जाईल.”